27.3 C
Latur
Thursday, February 27, 2025
Homeराष्ट्रीयकृष्णेकाठी १००० वर्ष जुनी ‘रामलल्ला’सारखी मूर्ती सापडली!

कृष्णेकाठी १००० वर्ष जुनी ‘रामलल्ला’सारखी मूर्ती सापडली!

रायचूर : तेलंगणा-कर्नाटक सीमेजवळ कृष्णा नदीच्या काठावर शतकानुशतके जुनी विष्णू मूर्ती आणि शिवलिंग सापडले आहे. कर्नाटकातील रायचूर येथे पुलाच्या बांधकामादरम्यान ही मूर्ती सापडली. याठिकाणी सापडलेल्या मूर्ती ११ व्या किंवा १२ व्या शतकातील असण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. विशेष म्हणजे, सापडलेली विष्णूची मूर्ती ही अयोध्येतील राम मंदिरात प्रतिष्ठापणा केलेल्या रामलल्लासारखी आहे. दशावताराच्या मूर्तीभोवती एक आभामंडळ आहे, ज्यावर भगवान विष्णूचे सर्व अवतार कोरलेले आहेत.

सध्या भगवान विष्णूची मूर्ती आणि शिवलिंग भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाने ताब्यात घेतले आहे. मूर्ती आणि शिवलिंगाचे परीक्षण होणार आहे. मात्र, ही मूर्ती जवळपास १ हजार वर्षे जुनी असल्याचा अंदाज आहे. रायचूर विद्यापीठातील प्राचीन इतिहास आणि पुरातत्व विभागाच्या प्राध्यापिका डॉ. पद्मजा देसाई यांनी सांगितले की, भगवान विष्णूची मूर्ती मंदिराच्या गर्भगृहाचा भाग असावी. याशिवाय, मंदिरावर हल्ला आणि तोडफोड केल्यानंतर भाविकांनी मूर्ती वाचवण्यासाठी तिला नदीत फेकले असावे, अशी शक्यताही व्यक्त केली जात आहे.

प्राध्यापिका डॉ. पद्मजा देसाई यांनी सांगितले की, भगवान विष्णूची मूर्ती ही अयोध्येतील रामललासारखी आहे. आभामंडळावर मत्स्य, कूर्म, नृसिंह, वामन, राम, परशुराम, कृष्ण, बुद्ध आणि कल्की असे भगवान विष्णूचे सुंदर १० अवतार कोरलेले आहेत. तसेच, उभ्या असलेल्या मूर्तीला चार हात आहेत, त्यापैकी दोन हात शंख आणि चक्राने सुशोभित आहेत. दोन हात खाली तोंड करून आशीर्वाद मुद्रेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR