22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeपरभणीपुर्णेत २२ वर्षीय तरुणाची तलवारीने हत्या

पुर्णेत २२ वर्षीय तरुणाची तलवारीने हत्या

पुर्णा : शहरातील श्री गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालयाच्या क्रीडांगण परिसरात अज्ञात हल्लेखोरांनी तिश्न शास्त्राने हल्ला करत एका २२ वर्षीय तरुणाची निर्घृण हत्या केल्याची घटना शुक्रवार दि. ८ डिसेंबर रोजी अंदाजे दुपारी ०२-०० ते ०२-३० सुमारास घडल्यामुळे परिसरात मोठी खळबळ माजली.

पुर्णा शहरातील आदर्श कॉलनी भागात असलेल्या श्री गुरू बुध्दीस्वामी महाविद्यालय परिसरात झालेल्या या निर्घृण हत्येच्या घटनेत मृत्यू झालेल्या युवकाचे नाव आकाश गणेश कदम राहणार गणपती मंदिर परिसर असे असल्याचे समजते. सदरील घटनेची माहिती मिळताच पुर्णा पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक प्रदीप काकडे, सहाय्यक पोलीस निरिक्षक शिंदे आपल्या पथकासह घटनास्थळी रवाना झाले.

यावेळी पो.नि. प्रदीप काकडे यांनी घटनेचे गांभीर्य लक्षात घेऊन श्वानपथकासह ठसे तज्ञांना देखील पाचारण केल्याचे समजते दरम्यान घटनास्थळी दोन दुचाकी वाहनांसह एक (बंदूक) व गोळी देखील आढळून आल्याचे पोलिस सुत्रांकडून समजते दरम्यान या घटनेची सखोल चौकशी पोलीस करीत असून पो.नि.प्रदिप काकडे व त्यांच्या पथकाने मयत तरुणाचा मृतदेह घटनास्थळ पंचणामा करुन उत्तरीय तपासणीसाठी पुर्णा शासकीय ग्रामीण रुग्णालयात पाठवल्याचे समजते पुढील तपास पूर्णा पोलीस स्टेशन करत आहे

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR