अमरावती : महाप्रसादाला नेतो असे सांगत तरुणीवर सामूहिक लैंगिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अमरावती जिल्ह्यात हा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. वरुड तालुक्यातील मालखेडमधील ही घटना आहे.
तरुणीला महाप्रसादासाठी नेतो, असे तिच्या आईला सांगत आरोपीने तरुणीला दुचाकीवर बसवून शेतात नेले आणि तिथे तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. पाच जणांनी तरुणीवर लैंगिक अत्याचार केल्याची घटना मन सुन्न करणारी घटना आहे.
महाप्रसादाच्या निमित्ताने २३ वर्षीय तरुणीला अमरावतीतील मालखेड येथे आणले आणि त्यानंतर परत नेऊन सोडण्याच्या बहाण्याने शेतातील झोपडीत नेऊन पाच जणांनी तिच्यावर सामूहिक अत्याचार केल्याची खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी वरुड तालुक्यातील शेंदूरजनाघाट पोलिसांनी आरोपींविरुद्ध अपहरण आणि अत्याचाराचा गुन्हा दाखल केला असून पाचही आरोपींना अटक करण्यात आली आहे. महेश वाघमारे, पिंटू हरले, रमेश भलावी, इस्माईल खाँ, नितीन ठाकरे (सर्व राहणार मालखेड) अशी आरोपींची नावे आहेत.