कोल्हापूर : कोल्हापुरात ५२ वर्षीय सुरक्षा रक्षकावर लैंगिक अत्याचार झाल्याचा धक्कादायक आरोप केला जात आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील हातकणंगले तालुक्यात कोरोची गावातील पाण्याच्या टाकीजवळ हा प्रकार घडला.
सुरक्षा रक्षकाला मारहाण करुन त्याच्यावर अत्याचार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या घटनेमुळे संपूर्ण परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण पसरले आहे.कोरोचीत माणुसकीला काळिमा फासणारी घटना घडली आहे. ५२ वर्षीय पुरुष सुरक्षा रक्षकावर रात्री लैंगिक अत्याचार घडला आहे. पीडित इसम आणि संशयित इसम हे दोघे एकमेकांच्या ओळखीचे आहेत. पीडित इसम हा सुरक्षा रक्षक म्हणून काम करतो.
संशयिताने पीडित व्यक्ती पत्र्याच्या शेडमध्ये एकटा असल्याचे पाहून त्याला बेदम मारहाण केली. त्याच्यावर अमानवी लैंगिक अत्याचार केला. संबंधित सुरक्षा रक्षकाने ही बाब भागातील नागरिकांना सांगितली. त्यानंतर संशयिताला नागरिकांनी बेदम चोप दिला. पीडित आणि संशयित दोघांनाही त्रास होऊ लागल्यामुळे नागरिकांनी त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले. अधिक तपास शहापूर पोलिस करत आहेत.