26.4 C
Latur
Wednesday, March 26, 2025
Homeसोलापूरपाचशे रुपयांसाठी सख्ख्या भावाने भावाच्याच डोक्यात घातला दगड

पाचशे रुपयांसाठी सख्ख्या भावाने भावाच्याच डोक्यात घातला दगड

सोलापूर : आपल्याकडे भावकीचा वाद नवा नाही. सोलापुरात अशीच एक धक्कादायक घटना घडली असून अवघ्या पाचशे रुपयांसाठी सख्ख्या भावाने भावाच्याच डोक्यात दगड घातला. यामध्ये नेताजी लक्ष्मण मोरे (५०) गंभीर जखमी झाले आहेत. उत्तर सोलापूर तालुक्यातील बीबी दारफळ येथे हा प्रकार घडला असून याप्रकरणी तानाजी लक्ष्मण मोरे यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नेताजी मोरे हे नेहमीप्रमाणे आपल्या शेतात काम करून हातपाय धुवूत होते. तेव्हा सख्खा भाऊ तानाजी मोरे तेथे आले. दोघांच्या शेतात सामाईकमध्ये बसविलेले एम.एस.सी.बी.चे खांब आहेत. या खांबाला तान दिला असून त्यासाठी एक हजार रुपयांचा खर्च आला आहे. हे पैसे मी भरले असून त्यातील निम्मे पैसे तू दे अशी मागणी केली. त्यावर नेताजी यांनी तानाचे पैसे देत नाही अशी भूमिका घेतली. यावरून दोघांत वाद झाला. तेव्हा तानाजी यांनी शिवीगाळ करत नेताजी मोरे यांच्या शर्टाला धरून डोक्यात दगड घातला. यामध्ये नेताजी जखमी झाले आहेत.

सोलापूर तालुका पोलिस ठाणे येथे या घटनेची नोंद झाली आहे. नेताजी मोरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून तानाजी मोरे यांच्याविरुद्ध भारतीय न्यायसंहिता २०२३ बी.एन.एस ११५ (२),११८(१), ३५१(२), ३५२ याप्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याप्रकरणी अद्याप पोलिसांनी कोणालाही अटक केली नाही. जखमी फिर्यादीवर रुग्णालयात उपचार करण्यात आल्याचे सांगण्यात आले. या घटनेचा अधिक तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल महिंद्रकर हे करत आहे. अवघ्या ५०० रुपयांसाठी भाऊच भावाचा वैरी बनल्याच्या प्रकाराची पंचक्रोशित चर्चा आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR