22.6 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeराष्ट्रीयट्रेनी डॉक्टरसोबत निर्दयी कृत्य

ट्रेनी डॉक्टरसोबत निर्दयी कृत्य

पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे गुप्तांगात १५१ मिली वीर्य सापडले

कोलकाता : ट्रेनी डॉक्टरच्या पोस्टमार्टेम रिपोर्टमध्ये धक्कादायक खुलासे; गुप्तांगात १५१ मिली वीर्य सापडले आहे. पोस्टमार्टेम करताना डॉक्टरांना धक्का बसला, रिपोर्ट पाहणा-या डॉक्टरांनी म्हटले एका व्यक्तीचा सहभाग अशक्य असून १० ते १५ जणांचा समावेश असू शकतो.

कोलकातामधील मेडिकल कॉलेजच्या ट्रेनी डॉक्टरचा बलात्कार करून खून झाल्याने देशभरातील डॉक्टर आंदोलनाला बसले आहेत. कोलकाता पोलिसांनी आरोपी संजय रॉय याला पकडले आहे. आता या घटनेत धक्कादायक माहिती हाती येत आहे. या महिला डॉक्टरवर गँगरेप झाल्याचे समोर येत आहे. यामधील खुलासे तिच्यावर गँगरेप झाल्याचे दर्शवत आहेत. पीडीतेच्या प्रायव्हेट पार्टमध्ये १५१ मिली वीर्य सापडले आहे. यामुळे खळबळ उडाली आहे. हा रिपोर्ट पाहणारे डॉक्टर सुबर्ण गोस्वामी यांच्यानुसार एवढ्या मोठ्या प्रमाणावर महिलेच्या गुप्तांगात वीर्य मिळणे हे गँगरेपचे संकेत आहेत. एका व्यक्तीने बलात्कार केला तर एवढे वीर्य मिळणार नाही. त्या महिला डॉक्टरसोबत अनेक जणांनी बलात्कार केला असावा. याचबरोबर आणखी एक धक्कादायक खुलासा म्हणजे या महिला डॉक्टरचे पाय ९० डिग्री पर्यंत उघडलेले होते.

कंबरेतून फाटल्याशिवाय हे होऊ शकत नाही. तिचा चष्मा तुटला होता, त्या चष्म्याच्या काचा तिच्या डोळ्यात मिळाल्या होत्या. तोंडातून रक्तस्त्राव होत असल्याच्या खुणा होत्या. हे सर्व तिच्यावर जेव्हा बलात्कार झाला तेव्हा एकापेक्षा जास्त जण तिथे होते, याकडे बोट दाखवत आहे. सीबीआयकडे हे प्रकरण गेले असून पोलिसांनी एकाच आरोपीला अटक केली आहे. उर्वरित आरोपी कोण होते, हॉस्पिटलमधीलच होते की बाहेरचे असाही सवाल उपस्थित होत आहे.

आत्महत्या नाहीच
पीडित डॉक्टरच्या वडिलांना त्यांच्या मुलीने आत्महत्या केल्याचे सांगण्यात आले होते. हॉस्पिटलमध्ये पोहोचले तेव्हा त्यांना आपल्या मुलीचा चेहरा पाहण्यासाठी तीन तास वाट पाहावी लागली होती. नंतर तिची अवस्था पाहून आत्महत्या नाही तर रेप असल्याचा संशय बळावला होता. एकूणच हे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न झाला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR