28.8 C
Latur
Saturday, November 22, 2025
Homeलातूरलातुरातील गुळ मार्केट चौकात बसने दुचाकीस्वारास चिरडले

लातुरातील गुळ मार्केट चौकात बसने दुचाकीस्वारास चिरडले

लातूर : निलंगा आगाराच्या शिवशाही बसने एका दुचाकी चालकाला चिरडल्याची घटना गुळ मार्केट चौकात गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास घडला. यामध्ये दुचाकीस्वार जागीच ठार झाला असून याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. जाफर युसूफ सय्यद (वय ५९ रा. आलमपुरा, शाम नगर, लातूर) असे मयत दुचाकीचालकाचे नाव आहे.

पोलिसांनी सांगितले, लातूर येथील मध्यवर्ती बसस्थानकातून निलंग्याकडे निघालेली शिवशाही बस (एम.एच. ०६ बी.डब्ल्यू. ०८९६) लातुरातील गुळमार्केट चौकात गुरुवारी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास आली. यावेळी दुचाकीवरुन (एम.एच. २४ बी.बी. २७७५) निघालेल्या जाफर युसूफ सय्यद यांची दुचाकी बसच्या समोरील चाकाखाली आली. यामध्ये दुचाकीचालक जाफर सय्यद हे बसने चिरडल्याने जागीच ठार झाले. घटनास्थळी गांधी चौक ठाण्याच्या पोलिसांनी भेट देऊन पंचनामा केला. याबाबत गांधी चौक पोलिस ठाण्यात लातूर येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व सर्वाेपचार रुग्णालयातील डॉ. विजय होळे यांच्या माहितीवरुन आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

लातूर शहरातील चौका-चौकामध्ये बेशिस्त वाहनधारकांमुळे गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचे चित्र कायम आहे. सिग्नल पडण्यापूर्वीच अनेक वाहनधारक भरधावपणे निघून जातात. परिणामी, अचानकपणे घुसलेल्या बेशिस्त वाहनधारकांमुळे वाहतुकीचा खोळंबा होत आहे. अशा वाहनधारकांवर कारवाईचा बडगा उगारण्याची गरज असून केवळ बेशिस्तपणामुळे अपघाताच्या घटनांमध्ये वाढ होत असल्याचे समोर आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR