17.8 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeमहाराष्ट्रनिवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी उमेदवाराने केला स्वत:च्याच घरावर गोळीबार

निवडणुकीत सहानुभूती मिळवण्यासाठी उमेदवाराने केला स्वत:च्याच घरावर गोळीबार

जळगाव : विधानसभा निवडणुकीत बरेच राजकीय नाट्य बघायला मिळाले. मतांसाठी उमेदवारांनी विविध शक्कली लढवल्या, मात्र जळगावातल्या एका उमेदवाराने तर मात्र हद्दच केली. निवडणुकीच्या मतदानापूर्वी दोन दिवस आधीच जळगावात एका अपक्ष उमेदवाराच्या घरावर गोळीबार झाल्याने खळबळ माजली होती. मात्र या घटनेचा उलगडा झाला असून उमेदवाराने स्वत:च आपल्या घरावर गोळीबार करायला लावल्याचे सत्य समोर आले आहे.

विधानसभा निवडणुकीत निवडून येता यावं, निवडणुकीमध्ये लोकांची सहानुभूती मिळवण्यासाठी त्या उमेदवारानेच आपल्या घरावर गोळीबार करून घेतल्याचा प्रकार उघड झाला आहे. याप्रकरणी एकूण ५ जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. जळगावमधील अपक्ष उमेदवार अहमद हुसेन शेख यांच्यासह त्यांच्या २ मुलांना अटक करण्यात आली आहे. त्यांना न्यायालयात हजर करण्यात आले असता १० डिसेंबर पर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. मात्र या गुन्ह्यात सहभागी असलेले दोन जण अद्याप फरार आहेत. तसेच गुह्यातील बंदुकीसह इतर मुद्देमाल जप्त करणे बाकी आहे. पोलिस त्यांचा कसून शोध घेत आहेत.

नेमके काय झाले?
मिळालेल्या माहितीनुसार, अहमद हुसेन शेख(५१) हे जळगाव विधानसभा मतदारसंघातून अपक्ष म्हणून निवडणूक लढवत होते. २० नोव्हेंबर रोजी राज्यभरात मतदान झाले तर २३ तारखेला मतमोजणी होऊन निकाल लागला. मात्र मतदानाच्या २ दिवस आधी १८ नोव्हेंबर रोजी पहाटे चारच्या सुमारा अहमद शेख यांच्या घरावर गोळीबार झाला होता. दोन गोळ्या लागून त्यांच्या घराच्या खिडकीची काच फुटली होती तर एक गोळी त्यांच्या घराच्या भिंतीवर लागली होती. यामुळे प्रचंड खळबळ माजली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR