27.8 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeमहाराष्ट्रकारची ट्रॅक्टरला धडक; ७ ठार

कारची ट्रॅक्टरला धडक; ७ ठार

खगरिया : प्रतिनिधी
बिहारमधील खगरिया जिल्ह्यात लग्न आटोपून परतणा-या कारची ट्रॅक्टरला धडक बसल्याने तीन चिमुकल्यांसह ७ जण ठार झाले. या अपघातात अन्य चार जण जखमी झाले आहेत. राष्ट्रीय महामार्ग ३१ वर हा अपघात झाला. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

कारमधील प्रवासी चौथम ब्लॉकवरून लग्न समारंभातून परतत होते. यादरम्यान राष्ट्रीय महामार्ग ३१ वर पळसरा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील विद्यारत्न पेट्रोल पंपाजवळ अपघात झाला. कारने ट्रॅक्टरला जोरदार धडक दिली.

यामध्ये सात जणांचा जागीच मृत्यू झाला. मृतांमध्ये तीन लहान मुलांचाही समावेश आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस आणि अधिकारी घटनास्थळी पोहोचले आणि जखमींना बाहेर काढले. या घटनेत चार जण जखमी झाले आहेत. जखमींना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR