22.3 C
Latur
Saturday, February 22, 2025
Homeधाराशिवपोहनेर येथे पंतप्रधानांचा फोटो असलेले पोस्टर फाडणा-यावर गुन्हा दाखल

पोहनेर येथे पंतप्रधानांचा फोटो असलेले पोस्टर फाडणा-यावर गुन्हा दाखल

धाराशिव : प्रतिनिधी
देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे डिजीटल पोस्टर फाडणा-या अज्ञात व्यक्तीवर धाराशिव ग्रामीण पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी पोहनेरच्या ग्रामसेविका अयोध्या शिंदे यांनी सरकारच्या वतीने फिर्याद दिली आहे.

धाराशिव तालुक्यातील पोहनेर येथे दि. २४ नोव्हेंबर रोजी सायंकाळी विकसीत भारत संकल्प यात्रा आली होती. शासनाच्या विविध योजनांची माहिती देणारी व्हॅन सोबत होती. ही व्हॅन पोहनेर येथील सुशिलादेवी कॉम्पलेक्स येथे उभी होती.

या व्हॅनवरील डिजीटल जाहिरातीचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे पोस्टर अज्ञात व्यक्तीने फाडून शासनाचे नुकसान केले. या प्रकरणी पोहनेरच्या ग्रामसेविका अयोध्या शंकर शिंदे यांनी सरकारतर्फे दिलेल्या फिर्यादीवरून धाराशिव ग्रामीण पोलीस ठाण्यात भादंवि कलम ३५३, ४२७ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण ठाण्याचे पोलीस आरोपीचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR