24.5 C
Latur
Thursday, December 12, 2024
Homeराष्ट्रीयखोदकामात सापडला खजिन्याने भरलेला हंडा

खोदकामात सापडला खजिन्याने भरलेला हंडा

बिजनौर : उत्तर प्रदेशमधील बिजनौर येथील करौंदा चौधर गावात खोदकामादरम्यान सापडलेल्या मोहरांनी भरलेल्या हंड्याची एकच चर्चा सध्या परिसरात सुरू आहे. येथे दफनभूमीच्या कुंपणाचं बांधकाम करण्यासाठी करण्यात येत असलेल्या खोदकामादरम्यान प्राचीन काळातील काही नाणी सापडली. येथे खोदकाम करत असलेल्या मजुरांना खोदकामादरम्यान हा हंडा मिळाला. त्यामध्ये १५ पांढ-या धातूची नाणी होती. ही नाणी चांदीची असल्याचा समज झाल्याने मजुरांनी ती आपापसात वाटून घेऊन घरी घेऊन गेले.

गावातील प्रमुखांना जेव्हा या घटनेची माहिती मिळाली, तेव्हा त्यांनी दफनभूमीत आणखी खोदकाम करून पाहिले. या खोदकामादरम्यान, आणखी दोन हंडे मिळाले. मात्र ते रिकामी होते. त्यानंतर पोलिसांना याबाबतची माहिती देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी दाखल होत आढावा घेतला आणि मजुरांकडून सापडलेली नाणी जप्त केली.

जप्त करण्यात आलेल्या नाण्यांवर अरबी भाषेमध्ये ११९३ हिजरी असा उल्लेख आहे. मात्र ही नाणी किती जुनी आहेत. तसेच ती कुठल्या धातूपासून तयार करण्यात आली आहेत, याबाबतची माहिती मिळू शकलेली नाही. प्राथमिक तपासामध्ये ही नाणी मुघलकालीन असावीत, असे सांगण्यात येत आहे.

आता पोलिसांनी ही सर्व नाणी ताब्यात घेत सुरक्षित ठेवली आहेत. तसेच डीएमनां याबाबतची माहिती दिली आहे. तसेच डीएमनां याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर पुरातत्व विभागाला या नाण्यांबाबत अधिक माहिती गोळा करण्याचे आदेश डीएमकडून देण्यात आले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR