सांगली : शिवसेना ठाकरे गटाला आणखी एक मोठा धक्का बसण्याची चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे. डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील आता उद्धव ठाकरेंची साथ सोडणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्याचे कारण म्हणजे चंद्रहार पाटील यांनी एकनाथ शिंदे यांची कुडाळमध्ये काही दिवसांपूर्वी भेट घेतली होती. चंद्रहार पाटलांच्या भेटीनंतर आणि भोजनानंतर ते ठाकरे गट सोडणार अशा चर्चा होत्या त्यावरती त्यांनी सोशल मीडियावरती पोस्ट लिहून स्पष्टीकरण दिले आहे.
पोस्टमध्ये त्यांनी लिहले आहे की मी माझ्या वैयक्तिक कामानिमित्त रत्नागिरी येथे गेलो असताना, राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात २००५ साली पासून म्हणजेच जवळपपास २० वर्षापूर्वी पासूनचे माझे मित्र व राज्याचे उद्योग मंत्री उदय सामंत यांनी मला स्रेह भोजणाचे आमंत्रण दिले, भोजन करून १५ ते २० मिनिटात मी बाहेर पडलो. या वेळी राज्यातील क्रीडा क्षेत्राबाबत चर्चा झाली, परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे.
या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, हे नक्की. परंतु माझ्या हितशत्रुंनी मला राजकीय जीवनातून बाद करण्यासाठी खोट्या बातम्या पेरण्याचा डाव केला आहे. या हितशत्रूचा बंदोबस्त केलेला लवकरच जनतेला पाहायला मिळेल, हे नक्की.
क्रीडाक्षेत्रासाठी कोणालाही भेटण्यात संकोच नाही
पुढे त्यांनी केलेल्या दुस-या पोस्टमध्ये म्हटले, राजकीय डावपेचापेक्षा, ज्या क्रीडा क्षेत्राने मला ओळख मिळवून दिली ते माझ्यासाठी जास्त महत्वाचे आहे, राज्याच्या क्रीडा क्षेत्राच्या विकासासाठी शासनातील महत्वाच्या व्यक्तींची भेट घेण्यात मला काही गैर वाटत नाही. याही पुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाचीही भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही. तर याही पुढे गरज भासल्यास क्रीडा क्षेत्रासाठी कुणाचीही भेट घेण्यात मला संकोच वाटणार नाही, असेही त्यांनी पुढे म्हटले आहे.