21.1 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपुण्यात रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या

पुण्यात रेल्वेखाली जोडप्याची आत्महत्या

पुणे : प्रतिनिधी
मुळचे कर्नाटकातील एकाच गावाच्या व कुर्डवाडी येथे राहर्णा­या जोडप्याने पुण्यात येऊन रेल्वे खाली आत्महत्या केल्याचा प्रकार समोर आला आहे. हिरगप्पा शरणाप्पा जमादार (वय ५०) आणि सौमयशरी सिद्धंिलग मड्डे (वय २७, दोघे रा. मदगुनकी, पो. झळकी बुद्रुक, जि. कलबुर्गी, कर्नाटक) अशी आत्महत्या केलेल्यांची नावे आहेत.

याबाबत लोहगाव पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पुणे रेल्वे स्टेशन प्लॉटफॉर्म क्रमांक ४ जवळील रेल्वे रुळावर मंगळवारी सकाळी साडेसात वाजण्यापूर्वी एका पुरुष व स्त्री यांनी रेल्वेखाली उडी मारुन आत्महत्या केली. घटनास्थळावर मिळालेल्या सॅकमध्ये त्यांची आधार कार्ड मिळाले.

त्यावरुन त्यांची ओळख पटली. दोघेही कर्नाटकातील एकाच गावचे राहणारे आहेत. पोलिसांनी त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतला. ते सध्या कुर्डवाडी येथे राहत असल्याची माहिती त्यांच्या नातेवाईकांनी पोलिसांना दिली. त्यांच्याकडे कुर्डवाडी ते पुणे असे प्रवासाचे तिकीट मिळाले आहे. दोघांची ओळख पटली असली तरी पुण्यात येऊन आत्महत्या करण्यामागचे नेमके कारण अद्याप समजून आले नाही. सहायक पोलिस निरीक्षक देसाई तपास करीत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR