22.4 C
Latur
Monday, September 16, 2024
Homeक्रीडाशमीच्या फार्म हाऊसबाहेर तोबा गर्दी

शमीच्या फार्म हाऊसबाहेर तोबा गर्दी

अमरोहा: : टीम इंडियाचा स्टार बॉलर मोहम्मद शमी आता जगभर प्रसिद्ध झाला आहे. शमी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असून येत्या दक्षिण आफ्रिका दौ-यासाठी त्याची निवड झाली आहे. त्याआधी एक व्हीडीओ समोर आला आहे ज्यामध्ये उत्तर प्रदेश येथील अमरोहात असलेल्या शमीच्या फार्म हाऊसबाहेर शेकडोंच्या संख्येने गर्दी जमली आहे.

दरम्यान, टीम इंडियाचा स्टार गोलंदाज मोहम्मद शमी याने वर्ल्ड कपमध्ये चमकदार कामगिरी करत सर्वांनाच धक्का दिला होता. आधी त्याला खाली बसवण्यात आले होते, मात्र जेव्हा प्लेईंग ११ मध्ये संधी मिळाली तेव्हा त्याने धुमधडाका केलेला पाहायला मिळाला होता. मोहम्मद शमीला संपूर्ण देशाने डोक्यावर घेतले होते. वर्ल्ड कपमधील दमदार प्रदर्शनानंतर शमीचे जगभर चाहते झाले.

मोहम्मद शमी याच्या फार्म हाऊसबाहेर चाहत्यांनी गर्दी केली होती. मोहम्मद शमी फार्म हाऊसवर असल्याची माहिती समजताचा चाहत्यांनी त्याच्यासोबत फोटो काढण्यासाठी गर्दी केल्याचे पाहायला मिळाले. शमीसोबत फोटो काढण्यासाठी जमलेली गर्दी पाहून त्याची सुरक्षा आणखी वाढवण्यात आली. मोहम्मद शमीने हा व्हीडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे.

मला प्रवास, मासेमारी, ड्रायव्हिंग, बाईक आणि कार चालवायला खूप आवडते. पण टीम इंडियासाठी खेळल्यावर मी बाईक चालवणे बंद केले. कारण जर बाईक चालवताना जखमी झालो तर… पण जेव्हा मी माझ्या आईला भेटायला जातो तेव्हा राष्ट्रीय महामार्गावर कधीतरी बाईक किंवा कार चालवतो,असे असल्याचे शमी म्हणाला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR