28.9 C
Latur
Friday, September 20, 2024
Homeसोलापूर१०० कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार: कुलगुरू प्रा. महानवर

१०० कोटी रुपयांच्या निधीतून विकसित सोलापूर विद्यापीठ घडणार: कुलगुरू प्रा. महानवर

सोलापूर : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून ज्याप्रमाणे विकसित भारत होत आहे, त्याचप्रमाणे प्रधानमंत्री उच्च शिक्षा अभियानातून मंजूर झालेल्या शंभर कोटी रुपयांच्या निधीतून दर्जेदार उच्च शिक्षण, संशोधन तसेच पायाभूत सुविधा उपलब्ध करून देऊन विकसित पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ घडविणार असल्याचा संकल्प कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर यांनी व्यक्त केला.

मंगळवारी, जम्मू येथून श्री नरेंद्र मोदी यांनी प्रधानमंत्री उच्च शिक्षण अभियानाचा शुभारंभ केला. त्याचे थेट प्रक्षेपण पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठाच्या मुख्य सभागृहात दाखविण्यात आले. याप्रसंगी कुलगुरू प्रा. प्रकाश महानवर हे बोलत होते.

याप्रसंगी प्र-कुलगुरू प्रा. लक्ष्मीकांत दामा, कुलसचिव योगिनी घारे, राज्यपाल नियुक्त व्यवस्थापन परिषदेचे सदस्य प्रा. देवानंद चिलवंत, राजाभाऊ सरवदे, प्रा. सचिन गायकवाड, चन्नवीर बंकुर, महेश माने, मोहन डांगरे, दादा साळुंखे, डॉ. गौतम कांबळे, डॉ. विकास पाटील यांच्यासह पदाधिकारी, शिक्षक, विद्यार्थी, अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते. प्रा. विकास घुटे यांनी प्रास्तविक केले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR