22.8 C
Latur
Friday, October 18, 2024
Homeराष्ट्रीयडबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका

डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका

लखनौ : काँग्रेसचे नेते राहुल गांधी यांनी आज त्यांच्या न्याय यात्रेदरम्यान भाजपाच्या डबल इंजिन सरकारच्या यशाच्या दाव्यांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. बेरोजगारीच्या मुद्यावरून दिल्लीतील मोदी सरकार आणि यूपीतील योगींच्या भाजपा सरकारवर निशाणा साधला आहे. राहुल गांधी यांनी डबल इंजिन सरकार म्हणजे बेरोजगारांना डबल फटका असे म्हटले आहे. तसेच त्यांची न्याय यात्रा शनिवारी उत्तर प्रदेशमध्ये पोहोचली. राहुल यांनी आपल्या ट्विÞटर अकाऊंटवरून याबाबत ट्विट केले आहे.

आज उत्तर प्रदेशातील प्रत्येक तिसरा तरुण बेरोजगारी नावाच्या आजाराने ग्रस्त आहे. जिथे दीड लाखांहून अधिक सरकारी पदे रिक्त आहेत, तिथे पदवीधर, पदव्युत्तर आणि पीएचडीधारक किमान पात्रता असलेले लोक रांगेत उभे आहेत. पहिले म्हणजे भरती निघणे हे स्वप्नच असते. भरती निघाली तर पेपर फुटतो, पेपर दिला तर निकाल कळत नाही आणि प्रदीर्घ प्रतिक्षेनंतरही निकाल लागतो, अनेकदा रुजू होण्यासाठी न्यायालयात जावे लागते. लष्करापासून रेल्वेपर्यंत आणि शिक्षणापासून पोलिसांपर्यंत भरतीसाठी वर्षानुवर्षे वाट पाहिल्यानंतर लाखो विद्यार्थी ओव्हरएज झाले आहेत.

निराशेच्या या चक्रव्यूहात अडकलेला विद्यार्थी डिप्रेशनला बळी पडत आहे आणि खचून जात आहे. या सगळ्यामुळे व्यथित होऊन जेव्हा तो आपल्या मागण्या घेऊन रस्त्यावर उतरतो तेव्हा त्याला पोलिसांच्या लाठीमार करण्यात येतो. विद्यार्थ्यासाठी नोकरी हे केवळ उत्पन्नाचे साधन नसून त्याच्या कुटुंबाचे जीवन बदलण्याचे स्वप्न आहे आणि हे स्वप्न भंगल्याने संपूर्ण कुटुंब निराश होते असेही राहुल गांधी यांनी म्हटले आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR