28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeराष्ट्रीयरेमंड ग्रुपवर दुहेरी संकट

रेमंड ग्रुपवर दुहेरी संकट

पती-पत्नीच्या भांडणात कंपनीचे कोट्यवधींचे नुकसान

नवी दिल्ली : बिझनेस टायकून अशी ओळख असलेले गौतम सिंघानिया सध्या प्रचंड चर्चेत आहेत. दिवाळीच्या दिवसांमध्येच त्यांनी पत्नी नवाज मोदी सिंघानियापासून विभक्त होण्याची घोषणा केली. ज्यानंतर या दोघांमधले मतभेद चव्हाट्यावर आल्याचा परिणाम रेमंड कंपनीवर होतो आहे. गौतम सिंघानियांवर नवाज मोदींनी अनेक आरोप केले आहेत. १३ नोव्हेंबरनंतर कंपनीच्या शेअर्समध्ये सातत्याने पडझड होते आहे. नवाज मोदी यांनी गौतम सिंघानियांनी मला आणि माझ्या मुलींना मारहाण केली असा आरोप केला. ज्यानंतर गौतम सिंघानियांच्या अडचणी व्यावसायिकदृष्ट्याही वाढल्या आहेत. कौटुंबिक कलह आणि कंपनीचे नुकसान असे दुहेरी संकट गौतम सिंघानियांपुढे ओढवले आहे.

प्रॉक्सी अ‍ॅडव्हायजरी फर्मने गौतम सिंघानिया आणि नवाज मोदी यांना चौकशीच्या दरम्यान संचालक मंडळापासून दूर राहण्यास सांगितले आहे. तसेच रेमंडला आता स्वतंत्र संचालकांची गरज आहे या संचालकांनी नवाज मोदींनी केलेले आरोप तपासून पाहावेत असं म्हटले आहे. त्यामुळे गौतम सिंघानियांच्या अडचणी वाढल्या आहेत. या फर्मने एक पत्र लिहिले आहे ज्यात असे म्हटले आहे की जे आरोप झालेत त्याची चौकशी स्वतंत्रपणे केली जावी. त्यात गौतम सिंघानिया आणि नवाज मोदींनी पडू नये.

या सल्लागार फर्मने संचालकांना हेदेखील विचारले आहे की या नवाज मोदींनी गौतम सिंघानियांवर केलेल्या आरोपांनंतरही तुम्ही मौन का बाळगले आहे? कारण या पती पत्नीच्या या कलहामुळे रेमंडमध्ये गुंतवणूक करणारे गुंतवणूकदार चिंतेत आहेत. गेल्या काही दिवसांपासून शेअर्समध्ये झालेली अभूतपूर्व घसरण हेच दाखवून देते आहे असंही या फर्मने म्हटले आहे.

शेअर्समध्ये घसरण सुरुच
गौतम सिंघानिया यांनी पत्नी नवाज मोदींपासून विभक्त होण्याची घोषणा केल्यानंतर रेमंडच्या शेअर्समध्ये घसरण सुरु आहे. मंगळवारी रेमंडचा शेअर ४.९९ टक्के पडला आणि १५६६.९० रुपये प्रति शेअर अशा निचांकी नोंदीला बंद झाला. मागच्या काही दिवसांमध्ये शेअर्स १७.६५ टक्के घसरला आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR