34.3 C
Latur
Friday, April 18, 2025
Homeमनोरंजनमहिला फॅनने केली संजय दत्तच्या नावावर तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी

महिला फॅनने केली संजय दत्तच्या नावावर तब्बल ७२ कोटींची प्रॉपर्टी

मुंबई : बॉलिवूडचा खलनायक असलेल्या संजूबाबाचे लाखो चाहते आहेत. पण, संजय दत्तची एक अशी चाहती होती जिने तब्बल ७२ कोटींची संपत्ती अभिनेत्याच्या नावावर केली होती.

संजय दत्त हा बॉलिवूडमधला सुपरहिट हिरो. त्याच्या स्टाइलवर लाखो मुली फिदा होत्या. अशाच चाहतींपैकी एक होत्या निशा पाटील. निशा पाटील या संजय दत्तच्या जबरा फॅन आणि म्हणूनच त्यांनी संजूबाबावर असलेल्या प्रेमापोटी त्यांची ७२ कोटींची प्रॉपर्टी थेट अभिनेत्याच्या नावावरच केली. त्याचं झालं असं २०१८ मध्ये संजय दत्तला पोलिसांचा फोन आला. निशा पाटील यांच्या मृत्यूच्या दुस-याच दिवशी पोलिसांनी हा फोन संजय दत्तला केला होता. निशा पाटील यांनी मृत्यूपूर्वी त्यांची प्रॉपर्टी संजय दत्तच्या नावे केल्याचे अभिनेत्याला सांगण्यात आले.

निशा यांनी बँकांना पत्र लिहून ही प्रॉपर्टी संजय दत्तला देण्यासाठी विनंती केली होती. हे कळल्यानंतर अभिनेत्यालाही आश्चर्याचा धक्का बसला होता. पण, संजय दत्तला या प्रॉपर्टीमध्ये कोणताही इंटरेस्ट नसल्याचे त्याच्या वकिलांनी सांगितले होते. निशा यांना संजूबाबा ओळखत नव्हता. त्यामुळे त्याने या प्रॉपर्टीवरही कोणताच अधिकार सांगितला नाही. अभिनेत्याच्या वकिलांनी सांगितले की तो याबद्दल काहीही करणार नाही आणि या संपत्तीवर अधिकारही सांगणार नाही.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR