दुबई : दुबईमधील बुर्ज खलिफा ही जगातील सर्वात उंच इमारत आहे. ही सर्वात उंच इमारत पाहण्यासाठी जगभरातून पर्यटक येतात. या इमारतीच्या प्रचंड लोकप्रियतेनंतर आता दुबईमध्ये बुर्ज खलिफाचे फीमेल व्हर्जन बांधली जाणार आहे. एम्मार आणि नून कंपनीचे संस्थापक मोहम्मद अलब्बर यांनी दुबईत फीमेल बुर्ज खलिफा बांधण्याची घोषणा केली आहे.
दुबई क्रीक हार्बर येथे एक नवीन मॉल बांधला जाईल. त्यात कारही चालवल्या जाणार आहेत. या कार इलेक्ट्रिक असतील, असे अलब्बर यांनी शारजाह उद्योजकता महोत्सव २०२४ मध्ये सांगितले. दरम्यान, कार मॉलमध्ये येण्याची ही पहिलीच वेळ असणार आहे. एवढेच नाही तर एम्मारकडून एक उंच टॉवरही बांधण्यात येणार आहे. हा टॉवर खूप उंच असणार आहे. मात्र, बुर्ज खलिफा पेक्षा लहान असेल. त्याला मंजुरी मिळाली असून, त्यावर कामही सुरू झाले आहे. येत्या काही महिन्यांत त्याचा लूक समोर येईल. कंपनी क्रीक टॉवरला बुर्ज खलिफाचे फीमेल व्हर्जन मानते. हे ६ मिलियन चौरस मीटरपेक्षा जास्त क्षेत्र व्यापेल आणि ते एक नवीन शहर बनेल अशी आशा आहे.
यावेळी अलब्बर म्हणाले, ही यूएईमधील सर्वात उंच इमारत नसेल. आमच्या कंपनीने त्या ठिकाणी एक किलोमीटर उंच टॉवर बांधण्याची योजना रद्द करण्याचा निर्णय घेतला. आपल्याकडून चूक झाल्याचे लक्षात आले. आम्ही हे टॉवर बांधतो कारण आम्ही अपार्टमेंटमधून पैसे कमवतो, जिथून टॉवर पाहता येऊ शकतो. पॅरिसमधील प्रत्येकाला आयफेल टॉवरसमोर अपार्टमेंट हवे आहे. आमच्या इमारती फक्त ५० मजली आहेत मग आम्हाला एक किलोमीटर उंच टॉवर का बांधायचा? अशा परिस्थितीत आम्ही ही योजना रद्द केली.
बुर्ज खलिफा ही सर्वात उंच इमारत
जगातील सर्व इमारतींमध्ये बुर्ज खलिफा ही सर्वात उंच इमारत आहे. हे जगातील सात आश्चर्यांपैकी एक आहे. बुर्ज खलिफा दुबई येथे आहे. दुबई हा जगातील सर्वात श्रीमंत देशांपैकी एक मानला जातो. या इमारतीची उंची ८२८ मीटर आहे. ही इमारत १६८ मजली आहे. बुर्ज खलिफाचे बांधकाम २१ सप्टेंबर २००४ रोजी सुरू झाले आणि त्याचे अधिकृत उद्घाटन ४ जानेवारी २०१० रोजी झाले.
काय आहे बुर्ज खलिफात?
उंचीमुळे, इमारतीच्या वरच्या मजल्यावरील तापमान तळ मजल्यांपेक्षा १५ अंश सेल्सिअस कमी आहे. लोकांनाही या इमारतीचे डिझाईन खूप आवडते. या इमारतीत फक्त ऑफिसच नाही तर सिनेमा हाऊस, मॉल, स्विमिंग पूल आणि मशीदही आहे. त्याच्या बांधकामाची एकूण किंमत १.५ अब्ज यूएस डॉलर्स होती.