23.9 C
Latur
Saturday, July 27, 2024
Homeअंतरराष्ट्रीयइम्रान खानवर मजुरी करण्याची वेळ

इम्रान खानवर मजुरी करण्याची वेळ

लाहोर : पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान यांना सिफर प्रकरणात १० वर्ष तुरुंगवासाची शिक्षा झाली. त्यांना रावळपिंडीच्या अदियाला तुरुंगात ठेवण्यात आले आहे. या तुरूंगात त्यास लेबर वर्क (मजुरीचे काम) करण्यास सांगितले आहे.

पाकिस्तानी मीडियानुसार, इम्रान खान आणि माजी परराष्ट्र मंत्री शाह महेमूद कुरैशी हे हाय प्रोफाईल कैदी असले तरिही त्यांना कारागृहामध्ये लेबर वर्क करावे लागेल. ‘द एक्सप्रेस ट्रिब्यून’च्या वृत्तानुसार ७१ वर्षीय इम्रान आणि ६७ वर्षांच्या कुरैशी या दोघांना हाय प्रोफाइल कैदी म्हणून वेगवेगळे ठेवण्यात आले आहे. इम्रान खान हे पाकिस्तानच्या तहरीक-ए-इंसाफ पक्षाचे संस्थापक अध्यक्ष आहेत. कुरैशी पक्षाचे उपाध्यक्ष आहेत.

दोघेही चांगल्या दर्जाच्या जेलमध्ये कैद्यांना दिल्या जाणा-या सुविधेचा लाभ घेत आहेत. दोषी ठरवण्याआधी ज्या सुविधा मिळत होत्या, त्याच सर्व सुविधा आहेत. यात एक्सरसाइज मशीन सुद्धा आहे. दोघांना जेल मॅन्युअलनुसार, तुरुंगातील कपड्यांचे दोन सेट दिले आहेत. पीटीआय अध्यक्षांवर अन्य प्रकरणात खटले सुरु आहेत. म्हणून त्यांना तुरुंगातील कपडे अनिवार्य करण्यात आलेले नाहीत. लिखित आदेशानुसार तुरुंगाच्या परिसरात दोघांना कामही करावे लागणार आहे.

पाकिस्तानात हाय-प्रोफाईल कैद्यांना जेलची फॅक्टरी, स्वयंपाकगृह, रुग्णालय, बगीचा आदि काम करणा-या कैद्यांसोबत ठेवले जात नाही. त्यामुळे त्यांना देखभाल आणि जेल प्रशासनाकडून दिले जाणारे काम करावे लागेल.

तो काळ सुद्धा शिक्षेत पकडणार
इम्रान आणि कुरैशी दोघेही स्वत:च जेवण स्वत: बनवू शकतात. जेल मॅन्युअल नुसार तयार जेवणही जेऊ शकतात. इम्रान खान आणि कुरैशीला दोषी ठरवण्याआधी अटक करण्यात आली होती, तेव्हापासून ते तुरुंगात आहेत. त्यामुळे तो काळ सुद्धा त्यांच्या शिक्षेमध्ये पकडला जाईल.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR