28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रचक्क विमानात सीटवरुन भांडण

चक्क विमानात सीटवरुन भांडण

तिघांची एकाला बेदम मारहाण

मुंबई : तुम्ही अनेकदा ट्रेन आणि बसमध्ये जागेसाठी वाद/मारामारी झाल्याचे पाहिले असेल. पण, आजकाल विमानात जागेसाठी मारामारी होत आहे. अशाप्रकारचे अनेक व्हीडीओही सोशल मीडियावर व्हायरल होतात. आता पुन्हा एकदा अशाच प्रकारचा व्हीडीओ समोर आला आहे. मुंबईला जाणा-या विमानात सीटवरुन काही प्रवाशांमध्ये जोरदार भांडण झाले. या भांडणाचा व्हीडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

व्हीडीओमध्ये काही प्रवाशांमध्ये सीटवरुन वाद सुरू असल्याचे दिसत आहे. पुढे हा वाद इतका टोकाला जातो की, प्रवाशांमध्ये हाणामारी सुरू होते. व्हीडीओमध्ये ३-४ प्रवासी एका व्यक्तीला मारहाण करताना दिसत आहेत. यावेळी एअर होस्टेस त्यांना थांबवण्याचा प्रयत्न करते, पण कोणीही तिचे ऐकत नाहीत. मिळालेल्या माहितीनुसार, विंडो सीटवर बसण्यावरून हा वाद झाला होता. या घटनेने सोशल मीडियावर लोकांना विचार करायला भाग पाडले की, विमानात अशी घटना कशी घडू शकते? अशा घटना सहसा ट्रेन आणि मेट्रोमध्ये घडतात. पण आता विमानांमध्येही सीटवरून भांडणे होऊ लागली आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR