बंगळूरू : स्मृती मानधनाच्या नेतृत्वाखालील गत चॅम्पियन्स रॉयल चॅलेंजर्स बंगळुरु संघानं यंदाच्या महिला प्रीमिअर लीगच्या तिस-या हंगामाची अगदी धमाक्यात सुरुवात केली. पण सलग दोन सामने जिंकल्यावर स्मृतीच्या ताफ्याची गाडी पटरीवरुन घसरलीये. सलग तीन पराभवाची नामुष्की या संघावर ओढावली आहे.
२७ फेब्रुवारीला गुजरात जाएंट्स विरुद्धच्या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बंगळुरुच्या संघाला पराभवाचा सामना करावा लागला. त्यानंतर आता पॉइंट्स टेबलमध्ये एका बाजूला भारतीय महिला संघाची उप कॅप्टन स्मृती मानधनाचा संघ कोमात अन् कॅप्टन हरमनप्रीत कौरचा संघ जोमात असा सीन पाहायला मिळत आहे. यंदाच्या हंगामातील सलग तिस-या पराभवानंतर आरसीबीचा संघ महिला प्रीमिअर लीगच्या गुणतालिकेत तिस-या स्थानावर आहे. ५ पैकी २ सामन्यातील विजयासह त्यांच्या खात्यात ४ गुण जमा आहेत. या संघाचे नेट रन रेट +०.१५५ इतके आहे. दुसरीकडे मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सचा संघ आघाडीवर असल्याचे दिसते. या दोन्ही संघांनी ४ सामन्यातील ३ विजयसाह आपल्या खात्यात प्रत्येकी ६-६ गुण जमा केले आहेत. नेट रन रेटच्या जोरावर मुंबई इंडियन्स महिला संघ टॉपला दिसत आहे.