25.7 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeमहाराष्ट्रअन्नपाण्याच्या शोधात बिबट्यांचा झुंड पुण्यात

अन्नपाण्याच्या शोधात बिबट्यांचा झुंड पुण्यात

पुणे : कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला जेरबंद केल्यानंतर पुणेकरांच्या जीवात जीव आला. पण तरी पुण्यातील बिबट्याची दहशत काही संपलेली नाही. एका बिबट्याला जेरबंद केल्यानंतर आता बिबट्याचा कळप रस्त्यावर फिरतो आहे.

पुणे जिल्ह्यातील जुन्नर तालुक्यात बिबट्यांचे दर्शन होणे काही नवीन नाही. इथल्या नागरिकांना कधी ना कधी बिबट्या दिसतो. पण एकाच वेळी तीन-तीन बिबट्यांचे दर्शन होणे हे दुर्मिळ आहे. असेच दृश्य दिसले ते गुरुवारी रात्री. नारायणगाव येथील जुन्नर-नारायणगाव रोडवरील श्री साईबाबा मंदिराजवळ असलेल्या धनंजय राजेंद्र दरंदळे यांच्या घराजवळ ३ बिबट्या फिरताना दिसले. हे बिबट्या सीसीटीव्ही कॅमे-यात कैद झाले आहेत. व्हीडीओत तुम्ही पाहू शकता सुरुवातीला एक त्यानंतर त्याच्यामागून आणखी दोन बिबट्या दिसतात. तिन्ही बिबट्या एकत्र जाताना दिसतात. पुढे हे तिन्ही बिबट्या एकत्र एका घरासमोर दिसतात. बिबट्या भक्ष्याच्या शोधात एकत्र फिरताना आढळले असून परिसरात मोठी दहशत निर्माण झाली आहे. नागरिकांनी या बिबट्यांना जेरबंद करण्याची मागणी केली आहे. दरम्यान कात्रज प्राणी संग्रहालयातून पळालेल्या बिबट्याला पकडण्यात प्रशासनाला यश आहे. हालचाली टिपणा-या वेगवेगळ्या कॅमे-यासह ९ पिंजरे लावण्यात आले होते. त्यात तो एका पिंज-यात अडकला.

या रेस्क्यू ऑपरेशन मध्ये पालिकेचे सुरक्षा दल, अग्निशमन दल, वनसंरक्षक दल सहभागी झाले होते. राजीव गांधी प्राणी संग्रहालयाचे प्रमुख डॉ. राजीव जाधव आणि अतिरिक्त आयुक्त विकास ढाकणे या रेस्क्यू ऑपरेशनवर बारीक नजर ठेऊन होते. ही मंडळी काल रात्रभर तिथे डोळ्यात तेल घालून तिकडे हजर होती. हे रेस्क्यू गाईड रन करत होती. अखेर त्यांच्या प्रयत्नांना यश आले. कात्रज प्राणी संग्रहालयात तीन मादी आणि एक नर जातीचा बिबट्या आहे. त्यामधील नर जातीचा बिबट्या पसार झाला होता. प्राण्यांच्या अदलाबदली कार्यक्रमांतर्गत हा बिबट्या कर्नाटकमधील हंपी येथून आणण्यात आला होता.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR