नाना नावाचा माणूस हरपला

पुणे/पणजी : प्रतिनिधी
भारतीय चित्रपटसृष्टीतील आपल्या असामान्य अभिनयाने, भारदस्त आवाजाने आणि डोळ््यांतून भावना व्यक्त करण्याच्या अद्वितीय शैलीने, साधेपणाने आणि माणूस म्हणून सतत जमिनीवर राहून लोकहिताचा ध्यास घेण्याने कोट्यवधी प्रेक्षक, लोकांच्या मनावर अधिराज्य गाजवणारे ज्येष्ठ अभिनेते नटसम्राट नाना पाटेकर यांचे गुरुवारी पहाटे गोव्यातील डोना पावला येथील त्यांच्या निवासस्थानी हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. ते ७५ वर्षांचे होते. पहाटे ५ वाजून २० मिनिटांनी डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या निधनाने संपूर्ण चित्रपटसृष्टी आणि चाहत्यांवर शोककळा पसरली. नाना पाटेकर यांच्या अचानक जाण्याने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीव्र दु:ख व्यक्त केले.

ज्येष्ठ अभिनेते नाना पाटेकर गोव्यातील डोना पावलामधील आपल्या घरी राहायला गेले होते. तेथे गुरुवारी पहाटे राहत्या घरी हृदयविकाराचा झटका आला होता. त्यानंतर त्यांना मणिपाल रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. मात्र, तिथेच उपचारादरम्यान नाना पाटेकर यांचे निधन झाले. मणिपाल रुग्णालयाचे कर्करोग विभाग प्रमुख डॉ. शेखर सालकर यांनी ४५ मिनिटे सतत सीपीआर देऊनही नाना पाटेकर यांना वाचवता आले नाही. नानांच्या जाण्याने सर्वत्र शोककळा पसरली. नाना पाटेकर यांच्या निधनाने मराठी तसेच हिंदी चित्रपटसृष्टीने केवळ एक अभिनेता गमावलेला नाही तर अभिनयाला स्वत:ची स्वतंत्र भाषा देणारे एक विलक्षण व्यक्तिमत्त्व गमावले आहे.

नाना पाटेकर यांना बुधवारी मध्यरात्री २.३० वाजता अस्वस्थ वाटू लागल्याने त्यांनी मित्राला मेसेज केला. मात्र, रात्र असल्याने मित्राने मेसेज पाहिला नाही. पण मेसेज पाहताच ते पहाटे ४ वाजता नाना पाटेकर यांच्या निवासस्थानी दाखल झाले. तेव्हा नाना फरशीवर बेशुद्धावस्थेत पडलेले दिसले. त्यांनी तात्काळ केअर टेकरला बोलावून रुग्णालयातून रुग्णवाहिका मागविली. रुग्णवाहिकेबरोबर त्यांचे वैद्यकीय पथकही निवासस्थानी दाखल झाले. वैद्यकीय पथकाने नानांना सीपीआर दिला. मात्र, त्यांच्याकडून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही. त्यामुळे त्यांनी मणिपाल रुग्णालयात दाखल केले. तिथेही सीपीआर देण्यात आला. मात्र, डॉक्टरांनी ५ वाजून २० मिनिटांनी त्यांना मृत घोषित केले, अशी माहिती मणिपाल रुग्णालयाच्या ऑन्कोलॉजी (कर्करोग) विभागाचे प्रमुख डॉ. शेखर साळकर यांनी दिली.

नाना पाटकेर यांनी रंगभूमीवरून आपल्या अभिनयाच्या करिअरची सुरुवात केली. त्यांनी गमन (१९७८) या चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले. परिंदा (१९८९) साठी त्यांना राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार मिळाला आणि क्रांतीवीर (१९९४) चित्रपटासाठी त्यांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला. पुढे त्यांनी अग्नी साक्षी, खामोशी : द म्युझिकल, अब तक छप्पन, अपहरण, राजनिती, वेलकम आणि मराठी चित्रपट नटसम्राट यासह अनेक चित्रपटांमध्ये कौतुकास्पद भूमिका साकारल्या. ते एक दिग्दर्शक, लेखकही होते. २०१३ मध्ये त्यांना चित्रपटसृष्टीतील महत्त्वपूर्ण योगदानाबद्दल पद्मश्री या पुरस्काराने गौरविण्यात आले.

सामाजिक कार्यात मोठे योगदान
सामाजिक कार्यात त्यांचे खूप मोठे योगदान आहे. मकरंद अनासपुरे यांच्यासोबत त्यांनी ‘नाम फाउंडेशन’ उभे केले. दुष्काळग्रस्त महाराष्ट्र, शेतकरी आत्महत्या, त्यांच्या विधवा, मुलांचे भविष्य, जलसंधारण, रोजगारनिर्मिती, या सगळ््यांमध्ये त्यांनी प्रत्यक्ष हात घातला. अनेक शेतकरी कुटुंबांना मदत दिली; विधवांसाठी रोजगाराच्या साधनांची उभारणी केली; गावांमध्ये पाणी साठवण्यासाठी कामे झाली; कालवे, नाले, जलसंधारण यावर काम केले. ‘नाम’ने चेक वाटणा-या संस्थेची चौकट ओलांडून ग्रामीण स्वावलंबनाच्या दिशेने जाण्याचा प्रयत्न केला. नानांचे काम भावनिक भाषणांपेक्षा थेट मातीशी जोडलेले होते. त्यामुळे ते अधिक उठावदार आणि लोकांच्या हृदयाला भिडणारे होते.

शासकीय इतमामात अंत्यसंस्कार
अभिनेते नाना पाटेकर यांचे मराठी नाटकासह मराठी, हिंदी सिनेमातील अतुलनीय योगदान पाहता त्यांचे अंत्यसंस्कार शासकीय इतमामात करण्याचा निर्णय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतल्याचे सांस्कृतिक कार्य मंत्री आशिष शेलार यांनी जाहीर केले.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

पुण्यात उभारणार महाराष्ट्रातील सर्वांत मोठे बसस्थानक; ८२५ कोटींचा पुनर्विकास...

पुणे : पुण्यातील शिवाजीनगर एसटी बसस्थानकाचा लवकरच कायापालट होणार...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला" आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
00:22
Video thumbnail
Rushikesh Karad|"नीट बोला"आमदार पुत्राला पोलिसांनी झापलं!
01:07
Video thumbnail
Nanded News | पाकिस्तानी क्रीममध्ये 48 हजार पट पारा! फॉरेन्सिक अहवालात धक्कादायक निष्कर्ष
03:02
Video thumbnail
Nanded|शक्तिपीठ महामार्ग रद्द करण्याच्या मागणीसाठी आंदोलन
05:43
Video thumbnail
Solapur Well Collapse: आंबे गावात विहीर खचली; चार जण मातीखाली अडकले, बचावकार्य सुरू
01:16
Video thumbnail
Latur Accident News: टाका पाटीजवळ भीषण अपघात; दोघांचा दुर्दैवी मृत्यू
00:41
Video thumbnail
Latur Bank Election : लातूरचा मतदार सन्मान गहाण ठेवणारा नाही – आमदार अमित देशमुख यांचे मोठे वक्तव्य
05:40
Video thumbnail
Latur District Bank Election: योग्य उमेदवाराला मतदान करा – दिलीपराव देशमुखांचे आवाहन
01:10
Video thumbnail
Nanded News: आंतरपिकात गांजाची लागवड; 9 लाख 24 हजारांचा गांजा जप्त, किनवटमध्ये LCB ची कारवाई
00:43
Video thumbnail
Latur District Bank Election: धमक्या, द्वेषाशिवाय विरोधकांनी काही केलं नाही – धीरज देशमुखांचा प्रहार
04:38
Video thumbnail
Latur District Bank Election 2026: जिल्हा बँकेची सत्ता कुणाची?
11:10
Video thumbnail
Latur District Bank Election: उद्या मतदान, ३० उमेदवार आणि ९९९ मतदार
03:17
Video thumbnail
Latur Blood Shortage: लातूर जिल्ह्यात रक्ताचा तुटवडा; AB Positive रक्तगटाची सर्वाधिक टंचाई
03:28
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलच्या विजयाचा धीरज देशमुखांना विश्वास
06:14
Video thumbnail
Latur District Bank Election: सहकार पॅनलला साथ द्या – ॲड. उदय गवारे यांचे आवाहन
02:59

Latest news