35.8 C
Latur
Monday, May 12, 2025
Homeराष्ट्रीयअत्तर निर्मिती कारखान्यास भीषण आग

अत्तर निर्मिती कारखान्यास भीषण आग

३३ जणांनी इमारतीवरून मारल्या उड्या

सोलन : सौंदर्यप्रसाधने आणि अत्तर तयार करणा-या अरोमा कारखान्याला भीषण आग लागली. आगीची तीव्रता भयावह असल्याने १८ तासानंतरही अग्निशमन दलाच्या जवानांना इमारतीत प्रवेश करता आला नाही. या दुर्घटनेत १३ जण बेपत्ता असून ४१ जणांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात यश आले आहे.

कारखान्यातील आगीत ३३ जण जखमी झाले आहेत. आगीपासून बचाव करण्यासाठी ३३ जणांनी इमारतीवरून उड्या मारल्या आणि त्यामुळे ते जखमी झाले. त्याचवेळी २० कर्मचारी सुरक्षित असल्याचे पोलिसांनी सांगितले. धुराचे लोट आणि आगीच्या झळांपासून वाचण्यासाठी कर्मचारी इमारतीच्या गच्चीवर गेले आणि सैरावैरा पळू लागले. चारमजली असलेल्या इमारतीवरून काहींनी उड्या मारल्या.

या उद्योगाच्या व्यवस्थापकाला तसेच कामगार देणा-या कंत्राटदारांना ठाण्यात पाचारण करण्यात आले. आगीची घटना घडली तेव्हा इमारतीत १०० कर्मचारी होते आणि त्यातील बहुतांश महिला होत्या. आगीचे कारण समजू शकले नाही. उद्योगात रासायनिक पदार्थांचा साठा असल्याने अनेक स्फोट झाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR