21.5 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रकल्याणमध्ये १७ व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग

कल्याणमध्ये १७ व्या मजल्यावरील फ्लॅटला भीषण आग

ठाणे : कल्याणमधील वरटेक्स या इमारतीच्या १५,१६,१७ व्या मजल्यावर भीषण आग लागल्याची दुर्दैवी घटना घडली. त्यानंतर, स्थानिकांकडून माहिती मिळताच येथील आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न अग्निशमन दलाच्या जवानांकडून करण्यात आले. मात्र, उंच इमारतीवरील फ्लॅटमध्ये ही आग लागल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाल्याचं पाहायला मिळाले. आग आटोक्यात आणण्यासाठी मोठी यंत्रणा सज्ज झाली होती, १५ ते २० ॲम्बुलन्ससह डॉक्टरांची टीम देखील घटनास्थळी दाखल झाली होती.

तर, अग्निशमन दलाच्या गाड्याही घटनास्थळी पोहोचल्या होत्या. मात्र, इमारतीला लागलेली आग विझवण्यासाठी पाण्याचा फवारा १७ व्या मजल्यापर्यंत जात नसल्याने आगीवर नियंत्रण मिळवण्यासाठी अग्निशमन दलालाही अडथळ्यांची कसरत करावी लागली. त्यामुळे, कल्याण डोंबिवली महापालिका मोठ्या मोठ्या इमारतींना बांधकामाची परवानगी देत आहे. मात्र, इमारतीचे फायर कार्यान्वित आहे का ?असा प्रश्न यानिमित्ताने उपस्थित होत आहे.

कल्याण डोंबिवली महानगरपालिका अग्निशमन दलाची गाडी आग विझविण्यासाठीसाठी आली आणि ती गाडीच ना दुरुस्त झाली या गाडीमुळे आग विझवण्यासाठी मोठा अडथळा निर्माण झाला, तर दुसऱ्या गाड्या त्या ठिकाणी पोहोचू शकल्या नाहीत. कल्याणमध्ये लागलेल्या इमारतीचे आग आटोक्यात आणण्यासाठी ठाणे महापालिका अग्निशमन दलाला प्राचारण करण्यात आले होते.

स्काय लिफ्ट या वाहनाच्याद्वारे अग्निशमन दल आग आटोक्यात आणण्यासाठी प्रयत्न करत होते, स्काय लिफ्ट वाहन कल्याण डोंबिवली महानगरपालिकेकडे आहे. मात्र, ते नादुरुस्त असल्याने आग आटोक्यात आणण्यासाठी या अग्निशमन दलालादेखील अथक प्रयत्न करावे लागले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR