17.5 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रअल्पवयीन चिमुरडीला दगडाने ठेचले

अल्पवयीन चिमुरडीला दगडाने ठेचले

जळगाव : बारा वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिची दगडाने ठेचून हत्या करण्यात आल्याची संतापजनक घटना जळगाव जिल्ह्यात चोपडा तालुक्यात घडली आहे. या प्रकरणी पोलिसांनी एका संशयितास ताब्यात घेतले आहे. या घटनेमुळे जळगाव जिल्ह्यात एकच खळबळ उडाली आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव जिल्ह्याच्या चोपडा तालुक्यातील विरवाडे परिसरात दोघी बहिणी शेतात कामाला गेल्या होत्या. कामावरून मालापूरकडून दोघी घरी परतताना बारा वर्षीय चिमुरडीला २५ वर्षीय संशयिताने विरवाडे शिवारातील शेतात ओढून नेले. तिथे तिच्यावर अत्याचार केला. त्यानंतर तिचा दगडाने ठेचून निघृण खून केला. खुनानंतर संशयिताने विवस्त्र अल्पवयीन मुलीला घटनास्थळावरून शंभर फूट ओढत नेत कापसाच्या शेतात फेकून दिले. मुलगी घरी परतली नसल्याने तिचा शोध घेत असताना, कापसाच्या पिकात तिचा अर्धनग्न अवस्थेत असलेला मृतदेह आढळून आला. याबाबत गावक-यांनी पोलिसांना माहिती दिली.

संशयिताला पोलिसांनी घेतले ताब्यात
घटनेची माहिती मिळताच चोपडा उपविभागीय पोलीस अधिकारी कुणाल सोनवणे, पोलिस निरीक्षक मधुकर साळवे, पोलिस उपनिरीक्षक जितेंद्र वल्टे यांच्यासह शहर पोलिस घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी तपासचक्रे वेगाने फिरविली. जळगावहून स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून मिळालेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी संशयिताला अटक केली आहे. या प्रकरणी पोलिस पुढील तपास करत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR