22.8 C
Latur
Thursday, February 22, 2024
Homeमहाराष्ट्रसलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट

सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट

राऊतांनी व्यंकटेश मोरेंचे फडणवीसांसोबतचे फोटो दाखवले

नाशिक : सलीम कुत्ता पार्टी प्रकरणात नवा ट्विस्ट आला आहे. भाजप पदाधिकारी व्यंकटेश मोरे यांचे देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत फोटो दाखवत संजय राऊत यांनी आरोप केले आहेत. व्यंकटेश मोरे यांनी पार्टीचे आयोजन केल्याचा दावा संजय राऊत यांनी केला आहे.

ठाकरे गटाचे नेते सुधाकर बडगुजर यांचा सलीम कुत्ता याच्यासोबत पार्टीत नाचतानाचा व्हीडीओ भाजपकडून दाखवण्यात आला. नितेश राणे यांच्यासह इतर भाजप नेत्यांनी गंभीर आरोप केले.

मात्र ही पार्टी भाजपच्या नेत्याने आयोजित केल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आला आहे. संजय राऊतांनी थेट पुरावे दाखवत पलटवार केला आहे.

ती पार्टी भाजप पदाधिका-याने आयोजित केली होती. व्यंकटेश मोरे यांनी आयोजित केलेल्या या पार्टीला बडगुजर यांना आमंत्रण दिले होते. सलीम कुत्ताला संबंधित गुन्हेगाराला पॅरोल कोणी दिला? गृहमंत्री कोण होते त्याची चौकशी करा. तो बॉम्बस्फोटामधील एवढा भयंकर गुन्हेगार होता, तर त्याला तुरुंगातून कोणी सही करून सोडले, याचा तपास भाजपने करावा आणि मग आमच्याकडे बोट दाखवावे, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे.

आजही व्यंकटेश मोरे नाशिकमध्ये भाजपचा पदाधिकारी आहे. त्याने सर्वपक्षीयांसाठी पार्टी आयोजित केली असेल, तर आपली परंपरा आहे जाणे, बसणे चर्चा करणे. भाजपमधील सलीम कुत्ताच्या सहका-यांना जे प्रश्न विचारतायत त्यांनी आधी स्वत: कडे बघावे, असे राऊत म्हणाले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR