21.5 C
Latur
Saturday, February 24, 2024
Homeसोलापूरबाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार

बाजार समितीच्या निवडणुकीचे बिगुल वाजणार

सोलापूर : सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीला अखेर मुहूर्त स्वरूप प्राप्त झाले. जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी बाजार समितीचे सचिवांना मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. चार जानेवारीपर्यंत प्रारूप मतदार याद्या देण्याचे आदेश दिल्याने नव्या वर्षात निवडणुकीचे बिगुल वाजणार आहे.

सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीच्या संचालकांची मुदतीत ऑगस्ट महिन्यात संपली होती. मात्र, शासनाने विद्यमान संचालक मंडळाला सहा महिने मुदतवाढ दिली. दि. १४ जानेवारी रोजी दिलेली मुदतवाढही संपणार आहे. तत्पूर्वी जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडून राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाला पत्र देऊन निवडणुकीसाठी अर्हता दिनांक देण्याची विनंती केली होती. त्यानुसार राज्य सहकारी निवडणूक प्राधिकरणाकडून दि. १ डिसेंबर २०२३ पर्यंतचे मतदार ग्रा धरण्याचे कळविले आहे.

मागील निवडणुकीत बाजार समितीच्या निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार होता. तत्कालीन सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या काळात हा निर्णय झाला होता. मात्र, त्यांच्याच पॅनलचा पराभव झाला होता. आता निवडणुकीत शेतकऱ्यांना मतदानाचा अधिकार नाही. मात्र, शेतकऱ्यांना सोसायटी अथवा ग्रामपंचायत मतदारसंघातून उभारता येणार असल्याचे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सांगितले.

सोलापूर बाजार समितीच्या संचालकांची मुदत दि. १४ जानेवारी रोजी संपणार आहे. त्यानंतर बाजार समितीचा कारभार प्रशासकांकडे जिल्हा उपनिबंधकांच्या हाती जाणार आहे. नवीन संचालक मंडळ अस्तित्वात येईपर्यंत प्रशासकांकडे सूत्रे राहणार आहेत. व्यापारी मतदारसंघ ०२,हमाल मतदारसंघ ०१,सोसायटी मतदारसंघ ११,ग्रामपंचायत मतदारसंघ ०४असे मतदारसंघ आहेत. प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध झाल्यानंतर हरकती मागविणे, सुनावणी घेणे आणि अंतिम मतदार याद्या तयार करण्यासाठी साधारण २० ते २५ दिवस लागणार आहे. त्यात जानेवारी महिना जाणार आहे. त्यामुळे फेब्रुवारीमध्ये निवडणुका होण्याची शक्यता आहे.

दि. १४ जानेवारी रोजी मुदतवाढीची तारीख संपणार आहे. तत्पूर्वी आणखी सहा महिने मुदतवाढ मिळविण्यासाठी विद्यमान पदाधिकाऱ्यांचा प्रयत्न सुरू आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून मुदतवाढ मिळविण्याची धडपड नेते करीत आहेत. सोलापूर बाजार समितीच्या निवडणुकीसाठी सोसायटी,ग्रामपंचायत, व्यापारी आणि हमाल या चारही मतदारसंघासाठी मतदार याद्या तयार करण्याच्या सूचना दिल्या आहेत. मतदार याद्या निश्चित झाल्यानंतर निवडणूक कार्यक्रम लावण्यात येईल असे जिल्हा उपनिबंधक किरण गायकवाड यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR