21 C
Latur
Wednesday, December 25, 2024
Homeराष्ट्रीयनववीतल्या मुलीने दिला बाळाला जन्म

नववीतल्या मुलीने दिला बाळाला जन्म

बंगळुरु : कर्नाटकात एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. नववी इयत्तेत शिक्षण घेणा-या एका मुलीने रुग्णालयात बाळाला जन्म दिला आहे. याबाबतची माहिती समोर आल्यानंतर कयाप्रकरणी पोलीस आणि समाज कल्याण विभागाकडूनदेखील तपास सुरु आहे. ही मुलगी कर्नाटकच्या चिक्कबल्लापूरमध्ये एका वसतिगृहात राहायची. पण ती अधुनमधून नातेवाईकांच्या घरी राहायला जाते सांगून वसतिगृहात न राहता दुसरीकडे राहायची. संबंधित प्रकरणाची प्रशासनाने गंभीर दखल घेतली आहे. तसेच मुलगी राहत असलेल्या वसतिगृहाच्या वॉर्डनला निलंबित करण्यात आलं आहे.

संबंधित मुलगी समाज कल्याण विभागाच्या वसतिगृहात वास्तव्यास होती. पण ती वसतिगृहात नियमित राहायची नाही. ती आपल्या नातेवाईकांना भेटायला जायचं सांगून हॉस्टेलमधून बाहेर पडायची. गेल्या काही दिवसांपासून ती वसतिगृहात आली नव्हती. त्यानंतर आता तिने एका बाळाला जन्म दिल्याची माहिती समोर आली आहे. पोलिसांनी देखील या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. पोलिसांनी या प्रकरणी पोस्को अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

मुलीचं दहावीच्या मुलासोबत होतं कनेक्शन
गेल्यावर्षी ऑगस्ट महिन्यात मुलीचं मेडिकल चेकअप झालं होतं. पण त्यावेळी तिच्या प्रेग्नंसीचा खुलासा झाला नव्हता. त्यामुळे कुणाचं या प्रकरणाकडे लक्ष गेलं नव्हतं. मिळालेल्या माहितीनुसार, मुलगी एक वर्षापूर्वीच संबंधित वसतिगृहात वास्तव्यास आली होती. त्यावेळी ती इयत्ता आठवीत शिक्षण घेत होती. या मुलीचं १० वीच्या विद्यार्थ्यासोबत कनेक्शन होतं. दोघे एका शाळेत शिकायला होते. दहावीच्या शिक्षणानंतर मुलाने ट्रान्सफर सर्टिफिकेट घेतलं आणि तो बँगलोरला राहायला गेला.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR