27.7 C
Latur
Monday, January 20, 2025
Homeमहाराष्ट्रमनमाड रेल्वेच्या शौचालयात आढळली दीड महिन्यांची चिमुकली

मनमाड रेल्वेच्या शौचालयात आढळली दीड महिन्यांची चिमुकली

रेल्वे पोलिसांत तक्रार दाखल

छ. संभाजीनगर : प्रतिनिधी
लिंगमपल्ली मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये मध्यरात्री अंदाजे एक ते दीड महिन्याची चिमुकली शौचालयात आढळून आल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. हा प्रकार रेल्वेत प्रवास करणा-या प्रवाशांना लक्षात आल्यानंतर त्यांनी मनमाड येथे गाडी पोहोचताच पोलिसांना याबाबत माहिती दिली.

त्यानंतर गाडीमध्ये या बाळासंदर्भात चौकशी करण्यात आली. मात्र, कोणीही त्याची जबाबदारी घेतली नसल्याने अखेर रेल्वे पोलिस ठाणे, मनमाड येथे याप्रकरणी तक्रार दाखल करण्यात आली.

नांदेड येथून लिंगमपल्ली मुंबई देवगिरी एक्स्प्रेसमध्ये कर्तव्यावर असणारे अयलया बुकीया राजिया यांनी तक्रारीत म्हटले की, सदर गाडी छत्रपती संभाजीनगर येथून निघाल्यानंतर रेल्वेच्या शौचालयात एक-दीड महिन्याची बेवारस चिमुकली आढळली. गाडी रेल्वे स्टेशनला पोहोचल्यानंतर जीआरपी यांनी बाळाला आपल्या ताब्यात घेतले. त्यानंतर पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली. तर पोलिस सध्या बाळाच्या आई-वडिलांचा शोध घेत आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR