विन्हेडो : ब्राझीलमधील विन्हेडो येथे ६२ प्रवाशांना घेऊन जाणारे प्रवासी विमान कोसळले. येथील स्थानिक टीव्ही स्टेशन ग्लोबोन्यूजच्या म्हणण्यानुसार, शुक्रवारी Voepass Linhas Aéreas चे Flight 2283 हे विमान परानामधील कॅस्केव्हल ते साओ पाउलोमधील ग्वारुलहोसकडे जात होते. हा अपघात विन्हेदो शहरात झाला असल्याच्या वृत्ताला स्थानिक अग्निशमन दलाने दुजोरा दिला आहे. पण, त्यांनी अधिक तपशील दिलेला नाही.
कॅस्केव्हल ते ग्वारुलहोस विमानतळाकडे जाणाऱ्या या विमानात ५८ प्रवासी आणि ४ क्रू मेंबर्स होते. एअरलाइनने सांगितले की त्यांनी बाधितांना मदत करण्यासाठी उपाययोजना सुरू केल्या आहेत. अपघाताचे कारण किंवा विमानातील लोकांची स्थिती यासंबंधीचे तपशील अद्याप मिळालेले नाही.
VOEPASS ने प्रवाशांना पाठिंबा देण्यासाठी सर्व उपाय केले आहेत. हा अपघात कसा झाला किंवा विमानातील लोकांची सद्यस्थिती काय आहे याबद्दल अद्याप कोणतीही माहिती नाही,ह्व असे निवेदनात म्हटले आहे.