परभणी : शहरातील जिंतूर रोड परीसरातील श्रीप्रल्हाद राम मंदिर महालक्ष्मी नगरात श्रीक्षेत्र साखरखेर्डा येथील श्रीसद्गुरू प्रल्हाद महाराज काळे (रामदासी) यांचे जीवन चरित्रावर आधारीत दोन अंकी नाटकाचा प्रयोग होणार आहे. अधिश्री देशपांडे (नागपूर) लिखीत, दिग्दर्शीत दोन अंकी नाटकाचा प्रयोग १८ फेब्रुवारी रोजी सायंकाळी ६ वाजता श्री प्रल्हाद राम मंदिर परीसरात होणार आहे.
शहरातील महालक्ष्मी नगरातील श्रीप्रल्हाद राम मंदिराच्या रौप्य महोत्सवी वर्धापन दिनाच्या निमित्ताने गोविंद रामानंद समर्थ सद्गुरू प्रल्हाद महाराज (रामदासी) संस्थान साखरखेर्डा प्रस्तुत रंगबावरा नागपुर निर्मित एक तत्व नाम या नाटकाच्या प्रयोगाचे आयोजन करण्यात आले आहे. या नाटकास आ. डॉ. राहूल पाटील, भागवताचार्य बाळू महाराज असोलेकर, वेदांत कोविद प्रमोद शास्त्री कुलकर्णी, वे.मू. प्रभाकरराव नित्रुडकर गुरू यांची उपस्थिती लाभणार आहे.