22.3 C
Latur
Saturday, September 7, 2024
Homeधाराशिवपानगाव वस्ती येथे पोलिस पथकावर हल्ला करून दगडफेक

पानगाव वस्ती येथे पोलिस पथकावर हल्ला करून दगडफेक

धाराशिव : प्रतिनिधी
गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी गेलेल्या स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकावर आरोपींसह त्यांच्या नातेवाईकांनी हल्ला करून दगडफेक केली. यामध्ये पथकातील काही पोलीस अधिकारी, कर्मचारी जखमी झाले आहेत. ही घटना दि. १३ मार्च रोजी घडली. या प्रकरणी येरमाळा पोलीस ठाणे येथे १५ ते २० जणांच्या विरोधात विविध कलमाखाली गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस पथक दि.१३ मार्च रोजी गुन्ह्यातील आरोपींना ताब्यात घेण्यासाठी कळंब तालुक्यातील पानगाव वस्ती येथे गेले होते. हे पथक पानगाव वस्ती येथील रॉयल हॉटेल समोर असताना गुन्ह्यातील आरोपी दशरथ नारायण पवार, डिगंबर नारायण पवार, सुनिता भारत चव्हाण, सारिका दशरथ पवार, रेश्मा दशरथ पवार यांना ताब्यात घेताना या आरोपींनी व इतर १० ते १५ जणांनी बेकायदेशीर जमाव जमविला. मोठमोठ्याने आरडाओरड करुन रोड आडविला. पोलीस पथकावर दगडफेक केली.

ज्यामध्ये एखाद्याचा जीव जावू शकतो हे माहित असताना देखील दगडफेक करुन पोलीस पथकातील अधिकारी व अमंलदार यांना जखमी केले. त्यांना शिवीगाळ व धक्काबुक्की करुन शासकीय कामात अडथळा निर्माण केला. या प्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस अंमलदार बबन जाधवर यांनी सरकारतर्फे दिलेल्या प्रथम खबरेवरुन येरमाळा पोलीस ठाण्यात विविध कलमान्वये गुन्हा नोंदवला आहे.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR