30 C
Latur
Wednesday, March 12, 2025
Homeलातूरलातूरात खाजगी बसने दोन मोटारसायकल चालकास चिरडले 

लातूरात खाजगी बसने दोन मोटारसायकल चालकास चिरडले 

एकास डोक्याला गंभीर मार; रुग्णालयात उपचार सुरु

लातूर : प्रतिनिधी ओव्हरटेक करण्याच्या गडबडीत खाजगी बस चालकाने स्वामी विवेकानंद पोलिस ठाण्याअंतर्गत असलेल्या डॉ बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दि १८ मे रोजी सकाळी ०७ वाजण्याच्या सुमारास दोन मोटारसायकल चालकास धडक देत खाजगी बसच्या समोरील टायरखाली एका मोटारसायकलला चिरडले तर दुर्स­या मोटारसायकलला समोरील बाजूने ठोकरले यात एकास डोकाला गंभीर मार लागला असुन रुग्णालयात उपचार सुरु असल्याची माहिती स्थानिकांकडून मिळत आहे.

डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे विलासराव देशमुख शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय येथे सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत असलेले रामदास पंढरी ताकपडे वय २६ राहणार मोळवण ता. अहमदपूर सध्या हरिभाऊ नगर लातूर हे आपली रात्रपाळीचे काम संपवून डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौक येथे दुध घेण्यासाठी एम एच २४ ए आर ५१०६ होंडा कंपनिची मोटारसायकल थांबले असताना पुणे- अहमदपूर- लोहा- कंधार जाणारी समोर राजधानी नाव लिहलेली एम एच ०४ जी एफ ६६६९ खाजगी बस दुस-या खाजगी बसला ओव्हरटेक करत या मोटारसायकल ला धडक देऊन चिरडली तर समोरच चौकात वळण घेऊन बौद्ध नगर येथे वळत असलेले महादेव कांबळे वय अंदाजे ५५ हे त्यांच्या मोटारसायकल क्रमांक एम. एच. २४ ए सी ९०६३ वरुन जात असताना या बसने ठोकरले आहे. यात महादेव कांबळे यांच्या डोक्याला गंभीर मार लागल्याचे स्थानिकांकडून समजते तर त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरु आहे.

लातूरमध्ये सध्या बेशिस्त वाहतुकीने नागरिक त्रस्त आहेत. गंजगोलाई परिसर, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, छ. शाहूमहाराज चौक या ठिकाणी रस्त्यावरच वाहने लावलेली असतात. ऑटो, दुचाकी, चारचाकी वाहने हे बेशिस्तपणे चालवले जातात. छ. शाहू महाराज चौकात तर थोड्याच अंतरावर मोठी शाळा आहे, मागे गेल्यावर्षी शाळेतल्या विद्यार्थ्यांने अपघातात जीव गमावला होता. रस्त्यावर लावलेले वाहतूक सिग्नल नावालााच आहेत. अनेक वर्षापासून बंद आहेत. कुठलीही घटना घडली की तात्पुरत्या स्वरूपात त्याच्यावर कार्यवाही होत नंतर मागचे दिवस पुढे. लातूर येथील दिवसेंदिवस वाढलेली बेशिस्त वाहतूक आणखी किती जणांचा जीव घेणार अशी चर्चा नागरिकांतून होत आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR