मुंबई : अजय देवगणच्या आगामी आझाद सिनेमाच्या ट्रेलर लाँचला ख-या घोड्याने सर्वांचे लक्ष वेधले असून अजय देवगणच्या आगामी ‘आझाद’ सिनेमाची सध्या चांगलीच चर्चा आहे. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचला पहिल्यांदाच घोडा दिसल्याने सर्वत्र चर्चा होत आहे. यावेळी आझाद सिनेमाच्या ट्रेलर लाँचला सिनेमातील कलाकार, निर्माते आणि संपूर्ण स्टारकास्ट उपस्थित होती.
आझाद च्या ट्रेलर लाँचला अजय देवगणने पुतण्या अमन देवगण आणि रवीना टंडनची लेक राशा थडानीसोबत खास फोटोशूट केले. कलाकारांनी ब्लॅक थीममध्ये केलेले फोटोशूट सर्वांच्या पसंतीस पडले. ‘आझाद’ सिनेमातून राशा थडानी आणि अमन देवगण पदार्पण करत आहेत.
पहिल्यांदाच बॉलिवूड सिनेमाच्या ट्रेलर लाँचला एका घोड्याने हजेरी लावली होती. यावेळी घोड्यासोबत सिनेमातील कलाकारांनी फोटोशूट केले. सिनेमाचे दिग्दर्शक अभिषेक कपूर यांनी अजय देवगण, अमन देवगण आणि राशा थडानीसोबत खास फोटो काढले. ‘आझाद’ सिनेमातील हा सुंदर घोडा सध्या बॉलिवूडमध्ये चर्चेत आहे. ‘आझाद’ सिनेमा १७ जानेवारी २०२५ ला थिएटरमध्ये रिलीज होत आहे.