घाबरू नका, हा नवीन विषाणू नाही

नवी दिल्ली : चीनमध्ये पसरलेल्या एचएमपीव्ही विषाणूचा इतर देशात फैलाव सुरू झाला आहे. भारतातदेखील काही बालकांना या विषाणाची लागण झाल्याचे समोर आले आहे. याबाबत आता केंद्रीय आरोग्य मंत्री जेपी नड्डा यांनी महत्वाची माहिती दिली. एचएमपीव्ही विषाणूमुळे घाबरण्याची गरज नसल्याचे नड्डांनी सांगितले आहे. तसेच, हा नवीन विषाणू नाही, २००१ मध्ये हा पहिल्यांदा आढळला होता.

सरकार यासाठी तयार असून आवश्यक ती सर्व पावले उचलली जात असल्याची माहिती त्यांनी दिली.
मिळालेल्या माहितीनुसार, चीनमध्ये आढळणारा हा विषाणू भारतातही आढळून आला असून, कर्नाटक, कोलकाता आणि गुजरातमध्ये या विषाणूची लागण झालेली बालके आढळली आहेत. आरोग्य मंत्री नड्डा यांनी तज्ञांचा हवाला देत स्पष्ट केले की, एचएमपीव्ही अनेक वर्षांपासून जगभरात पसरत आहे. हा हवेतून पसरतो आणि सर्व वयोगटातील लोकांना प्रभावित करू शकतो. हिवाळा आणि ऋतू बदलाच्या सुरुवातीच्या महिन्यांत हा विषाणू अधिक पसरतो, पण याला फार घाबरण्याची गरज नाही.

परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी ४ जानेवारी रोजी आरोग्य सेवा महासंचालकांच्या अध्यक्षतेखाली एक संयुक्त देखरेख गटाची बैठक झाली. देशाच्या आरोग्य यंत्रणा आणि पाळत ठेवणारे नेटवर्क सतर्क आहेत. आम्ही कुठल्याही प्रकारच्या आव्हानांना त्वरित प्रतिसाद देण्यासाठी तयार आहोत. काळजी करण्याची गरज नाही. आम्ही परिस्थितीवर बारकाईने लक्ष ठेवून आहोत, अशी माहितीहीदेखी जेपी नड्डांनी दिली.

एचएमपीव्ही विषाणूबद्दल तज्ज्ञांचे मत काय?
या विषाणूबाबत सरकारने गांभीर्याने पावले उचलण्याची गरज आहे, असा इशारा प्रसिद्ध हृदयरोगतज्ज्ञ डॉ. कुणाल सरकार यांनी दिला आहे. ते म्हणाले, सरकारने सावधगिरी बाळगली पाहिजे आणि या विषाणूपासून आपल्या नागरिकांचे संरक्षण केले पाहिजे. एचएमपी विषाणू हा आरएनए-असलेला विषाणू आहे, जो संसर्गजन्य असूनही, कोविड-१९ सारखा गंभीर नाही. त्याच्या सामान्य लक्षणांमध्ये ताप, खोकला आणि सर्दीचा समावेश आहे.

एचएमपीव्हीबाबत महाराष्ट्र सरकारचा सल्ला
देशातील काही राज्यांमध्ये विषाणूची ओळख पटल्यानंतर महाराष्ट्र सरकारने देखील एक निवेदन जारी केला आहे. एचएमपीव्ही हा एक सामान्य विषाणू आहे, ज्यामुळे सामान्य सर्दी सारखा संसर्ग होऊ शकतो. २००१ मध्ये नेदरलँड्समध्ये हा पहिल्यांदा आढळला होता. हा विषाणू हंगामी आहे, सामान्यत: हिवाळ्यात आणि उन्हाळ्याच्या सुरुवातीस जास्त प्रमाणात आढळतो, असे महाराष्ट्र सरकारने म्हटले आहे.

Hot this week

नांदेडात एकाच दिवशी दोन अधिकारी निलंबित

नांदेड : महापलिकने हाती घेतलेल्या १०० दिवस विशेष कार्यक्रमात...

कोलकात्याकडून दिल्ली पराभूत

दिल्ली : कोलकाता नाईट रायडर्स टीम अखेर विजयी ट्रॅकवर...

यंदाही मुलींचीच बाजी

पुणे : महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण...

कृषी विभागात किरण जाधव नावाचा नवीन आका

बीड : भाजप आमदार सुरेश धस यांनी कृषी विभागातील...

…म्हणून वाणीची एन्ट्री झाली

मुंबई : अजय देवगणचा नुकताच रेड २ रिलीज झाला....

Related Articles

EKMAT DIGITAL
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
22:40
Video thumbnail
Dharashiv|उमरग्यात मराठा आंदोलकांचा उद्रेक! तहसीलदारांची खुर्ची पेटवली; 4 जण ताब्यात
02:51
Video thumbnail
Jalkot|जळकोटमध्ये पावसाने ओढ दिली! कोरडा दुष्काळ जाहीर करा; राष्ट्रवादीची मोठी मागणी
02:05
Video thumbnail
Latur|लातूरच्या सदानंद विद्यालयात ‘शालार्थ आयडी’ घोटाळ्याचा आरोप!
05:05
Video thumbnail
Latur|लातूरमध्ये नाभिक समाजाचा गौरव सोहळा; जिल्हाभरातून समाजबांधवांची उपस्थिती
02:27
Video thumbnail
Latur|‘तुम से ना हो पायेगा’! अंबादास दानवेंचा सरकारवर हल्लाबोल; लातूरमध्ये शिवसेनेचं आंदोलन
07:57
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्याने मराठा आंदोलक संतप्त; हदगावमध्ये बॅनर फाडले
00:33
Video thumbnail
Nanded|विखे पाटलांच्या वक्तव्यानंतर आंदोलनाची धार वाढली? बरडशेवाळ्यात मराठा समाजाचा रास्ता रोको
00:33
Video thumbnail
Nanded|उभ्या पिकात ट्रॅक्टर फिरवला! पावसाअभावी नांदेडच्या शेतकऱ्याची हतबलता
02:06
Video thumbnail
Nanded|मराठवाड्याचा मुक्ती संग्राम पाठ्यपुस्तकात घ्या! नांदेडमधून शासनाकडे मोठी मागणी
03:26
Video thumbnail
Latur|हातातोंडाशी आलेला घास गेला! लातूरमध्ये पाण्याअभावी उभी पिकं करपली
03:42
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
07:57
Video thumbnail
LIVE- लातूरच्या विविध प्रश्नावर शिवसेना(UBT)गटाचे‘तुम से ना हो पायेगा’ आंदोलन!
10:46
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
19:02
Video thumbnail
LIVE- महाराष्ट्रातील दिवसभरातील महत्त्वाच्या आणि झटपट घडामोडी.
16:29

Latest news