21.8 C
Latur
Saturday, December 28, 2024
Homeसोलापूरपिलीव येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च

पिलीव येथे निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर रूट मार्च

पिलीव : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर लोकसभेच्या निवडणुका निर्भय वातावरणात पार पडाव्यात, आचारसंहितेचे काटेकोर पालन केले जावे, कायदा सुव्यवस्था अबाधित राहावी यासाठी पिलीव येथे पोलिसांचा रूट मार्च काढण्यात आला.

सोलापूर जिल्हा ग्रामीण भागाचे पोलिस अधीक्षक शिरीष देशपांडे यांच्या मार्गदर्शनाखाली अकलूज विभागाचे पोलिस उपअधीक्षक शिरगावकर, माळशिरस तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, पिलीव आऊट पोस्टचे पोलिस उपनिरीक्षक दत्तात्रय मोहिते व पोलिस कर्मचारी यांनी पिलीव बसस्थानकावरील पिलीव दूरक्षेत्राच्या कार्यालयापासून पिलीव बाजारपेठेतून वेशीपर्यंत रूट मार्च काढला.

यावेळी माळशिरस पोलिस स्टेशनचे पोलिस कर्मचारी पोलिस मुख्यालयाकडील आरसीपी पथकाचे कर्मचारी, अधिकारी, सीआयएसएफकडील जवान आदींसह ८५ पोलिस व इतर कर्मचारी, शस्त्रधारी कमांडो सहभागी झाले होते. यावेळी माळशिरस तालुका पोलिस स्टेशनचे पोलिस निरीक्षक नारायण पवार, पिलीव आऊट पोस्टचे उपनिरीक्षक एपीआय दत्तात्रय मोहिते, पोलिस कर्मचारी धनाजी झगडे, सतीश धुमाळ, अमित जाधव, मन्सूर नदाफ यांनी नियोजन केले. यावेळी ८५ पोलिस कर्मचाऱ्यांनी रूट मार्च करून संचलन केले.

यामुळे जनता औत्सुक्याने याकडे पाहत होती. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर सोलापूर जिल्ह्यात शस्त्रबंदी व १४४ कलम जारी केले असल्याचे यावेळी सांगण्यात आले. सार्वजनिक शांततेचा आचारसंहितेचा भंग करणारांवर कठोर कायदेशीर कारवाई केली जाईल तसेच पुढील भागातील परवानाधारक यांच्याकडे असणाऱ्या बंदुका, पिस्तूल आदी पोलिस दूरक्षेत्रात जमा करण्याच्या संबंधितांना सूचना दिल्या.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR