26.4 C
Latur
Friday, May 17, 2024
Homeसोलापूरगुढीपाडव्यासाठी २५ हजार किलो साखरेचे हार तयार

गुढीपाडव्यासाठी २५ हजार किलो साखरेचे हार तयार

सोलापूर : अवघ्या सहा दिवसांवर गुढीपाडव्याचा सण येऊन ठेपला आहे. साडेतीन मुहतपैिकी एक असलेल्या गुढीपाडव्याच्या सणाला साखर हारांना अधिक महत्त्व असते. या दिवशी साखर हार घालून गुढीची पूजा केली जाते. यंदाच्या वर्षी साखरहार दर स्थिर आहेत. ५० ते ७५ रुपये प्रति कीलोने साखरहार विक्री होत आहेत. किरकोळ बाजारात ७० ते १०० रुपये किलो दराने विक्री होत आहे. पाडव्यासाठी २५ हजार किलो साखरेचे हार तयार केले आहेत.

शहरात साखरहार तयार करणारे दोन मोठे व आठ लहान कारखाने आहेत. या कारखान्यांत ५० किलो वजनाचे सुमारे ५०० कट्टे हार तयार केले जात आहेत. यात सुमारे २५ हजार किलो साखरहार तयार केले जात असल्याचे शेळगी-दहिटणे रोड येथील स्वामी समर्थ साखरहारचे कारखानदार तानाजी निर्मळ यांनी सांगितले. साखर हारांत विविध प्रकार आहेत. यात गुजराती, महाराष्ट्र, सोलापूर अशा तीन प्रकारांत हार तयार केले जातात. सोलापूर लोकलमध्ये चक्री, चंपाकली, प्लेन असे तीन प्रकार आहेत. गुजराती ५० रुपये, महाराष्ट्र ५५ रुपये, सोलापुरी ७५ रुपये प्रतिकिलो दराने विक्री होत आहे.

सुरुवातीला चांगल्या प्रकारचा पाक बनविला जातो. पाक तयार झाल्यानंतर साखरगाठीच्या वेगवेगळ्या साच्यामध्ये तो पाक ओतून त्यामध्ये एक बारीक दोरी टाकली जाते. पाक घट्ट झाल्यानंतर साचा उघडल्यावर ही साखरगाठ तयार होते. छोट्या साखरगाठीपासून ते पाच किलोंपर्यंत साखरगाठी बनविल्या जातात. गेल्या तीन पिढ्यांपासून आमच्या कुटुंबात साखरहार तयार करण्याची परंपरा आहे. दर वर्षी स्वामी समर्थ साखरहार या कारखान्यात ५०० किलो साखरहार तयार करुन विक्री करतो. आमच्याकडे चक्री, चंपाकली, प्लेन या तीन प्रकारांत हार बनविले जातात असे हार कारखानदार तानाजी निर्मळ यांनी सांगीतले.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR