28.9 C
Latur
Sunday, January 19, 2025
Homeमहाराष्ट्रपरभणी शहरात धावत्या कारने घेतला पेट

परभणी शहरात धावत्या कारने घेतला पेट

परभणी : शहरातील वसमत रोडवरून शनिवार, दि.२ डिसेंबर रोजी सकाळी १० वाजण्याच्या सुमारास परभणी शहराकडे येत असलेल्या एका धावत्या कारने अचानक पेट घेतला. ही घटना वसमत रस्त्यावरील औद्योगिक वसाहत परिसरातील गेट क्र.१ जवळ घडली. रस्त्यावरच कारने पेट घेतल्याने वाहतूक विस्कळीत झाली होती.

परभणी शहरात शनिवारी सकाळी १०च्या सुमारास कार क्रमांक एम. एच. १५ ईएक्स ८१०६ ही चंद्रपूर येथून नाशिककडे जात होती. या कारमध्ये एकूण ६ जण प्रवास करत होते. ही कार परभणी शहरातील औद्योगिक वसाहत परिसरात येताच कारने पेट घेतला. वेगात असलेल्या कारने पेट घेतल्याचे चालकाच्या लक्षात येताच त्याने प्रसंगावधान राखून कार थांबवली व कारमधील सर्वांना बाहेर काढले.

स्थानिक नागरिकांच्या मदतीने आग विझविण्याचा प्रयत्न केला. काही वेळाने अग्नीशमन दलाच्या पथकातील गौरव देशमुख, बालाजी जाधव, अक्षय पांढरे, संतोष मुदिराज यांनी घटनास्थळी पोहोचून आग विझवली. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. परभणी शहर वाहतूक शाखेचे मकसुद पठाण, पोलीस अमलदार मुस्ताक शेख, प्रल्हाद देशमुख, बालाजी जाधव, अनिल राठोड यांनीही माहिती मिळताच घटनास्थळी धाव घेतली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR