28.8 C
Latur
Tuesday, March 18, 2025
Homeअंतरराष्ट्रीयअमेझॉनच्या १४ हजार कर्मचा-यांवर गंडांतर?

अमेझॉनच्या १४ हजार कर्मचा-यांवर गंडांतर?

भारतीय कर्मचा-यांना ले-ऑफची शक्यता

बिजींग : वृत्तसंस्था
सध्या जगभर मंदीचे सावट असून अनेक दिग्गज कंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. यापूर्वी ऍपल, सॅमसंग सारख्या दिग्गज टेक कंपन्यांनी जगभरातील युनिटमधून मोठ्या प्रमाणात कर्मचा-यांना नारळ दिला. इन्फोसिस, टीसीएस सारख्या भारतीय कंपन्यांचाही यात समावेश आहे. यामध्ये आणखी एका मोठ्या कंपनीची भर पडणार आहे. ई-कॉमर्स क्षेत्रातील सर्वात मोठी कंपनी असलेल्या अ‍ॅमेझॉनने कर्मचारी कपातीची मोठी घोषणा केली. यामध्ये भारतीय कर्मचा-यांचाही समावेश असू शकतो.

खर्चात कपात करण्यासाठी ऍमेझॉन यावर्षी हजारो कर्मचा-यांना कामावरून काढण्याची शक्यता आहे. कंपनी यावर्षी सुमारे १३% कर्मचारी कमी कपात करण्याचा अंदाज आहे. त्यानुसार, तब्बल १४,००० कर्मचा-यांना कामावरुन काढले जाऊ शकते. ‘एआय’च्या आव्हानांचा सामना करण्यासाठी आणि जास्तीत जास्त नफा मिळवण्यावर कंपनीने हा निर्णय घेतला असल्याचे बोलले जात आहे.

फायनान्शियल एक्स्प्रेसच्या अहवालानुसार, ऍमेझॉन नोकर कपातीची लवकरच घोषणा करण्याची शक्यता आहे. यानंतर कंपनीला दरवर्षी सुमारे २.१ ते ३.६ अब्ज अमेरिकन डॉलर बचत करण्यात मदत होईल. या टाळेबंदीचा जागतिक कामगारांवर परिणाम होईल. एकूण कर्मचा-यांची संख्या १,०५,७७० वरून ९१,९३६ पर्यंत कमी होईल. कंपनीमध्ये दरवर्षी अशा प्रकारे नोकर कपात केली जाते. उत्पादन क्षमता वाढवणे आणि पुनर्रचना करणे हा या योजनेचा भाग आहे.

ऍमेझॉनचे सीईओ अँडी जॅसी यांनी ई-कॉमर्स दिग्गज कंपनीची कार्यक्षमता वाढविण्यासाठी आणि कर्मचा-यांना कामावरून काढण्याची प्रक्रिया सुलभ करण्यासाठी एक धोरण जाहीर केले. अहवालानुसार, अँडी जॅसी यांनी २०२५ च्या पहिल्या तिमाहीत व्यवस्थापकांना वैयक्तिक योगदान १५%ने वाढवण्याची योजना शेअर केली. टाळेबंदीमुळे कर्मचारी संख्या कमी करण्यास आणि कामकाजाला गती देण्यास मदत होईल, असं मत अँडी जॅसी यांनी व्यक्त केलं.

या अहवालात मॉर्गन स्टॅनलेच्या अहवालाचा हवाला देण्यात आला आहे. त्यानुसार, अमेझॉनमधील नोकर कपातीचा परिणाम पुढील वर्षी सुमारे १३,८४३ कर्मचा-यांवर होऊ शकतो. या निर्णयामुळे कंपनीचा खर्च मोठ्या प्रमाणात वाचणार असून नफ्यात वाढ होईल. नोकर कपातीनंतर कंपनी पगार रचनेचा आढावा घेणार असून वरिष्ठ पदांसाठी भरती मर्यादित करणार असल्याचे म्हटले जात आहे.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR