24 C
Latur
Thursday, September 19, 2024
Homeराष्ट्रीयएक ठिणगी आणि गेम झोन भस्म

एक ठिणगी आणि गेम झोन भस्म

राजकोट : गुजरातमधील राजकोट येथे टीआरपी गेम झोनमध्ये २५ मे रोजी संध्याकाळी झालेल्या भीषण अग्नितांडवामध्ये १२ मुलांसह ३५ जणांचा मृत्यू झाला होता. दरम्यान, आता या दुर्घटनेचे आणखी एक सीसीटीव्ही फुटेज समोर आले आहे. त्यामध्ये एका ठिणगीने भीषण आगीचे रूप घेतले आणि दोन मिनिटांच्या आत संपूर्ण गेम झोन आगीच्या विळख्यात सापडला, असे दिसत आहे. आग लागल्याची माहिती मिळाल्यानंतर अग्निशमन दल आणि पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली होती. तसेच अग्निशमन दलाच्या आठ पथकांनी प्रयत्नांची शर्थ करत सुमारे ३ तासांनी या आगीवर नियंत्रण मिळवण्यात यश मिळवलं. दुर्घटनेनंतर २५ हून अधिक जणांना घटनास्थळावरून वाचवण्यात यश आलं. मात्र या भीषण अग्नितांडवात ३५ हून अधिक जणांचा मृत्यू झाला.

राजकोट गेमिंग झोनमधील झालेल्या दुर्घटनेचा आणखी एक सीसीटीव्ही कॅमेरा समोर आला आहे. त्यामध्ये एक छोटीशी ठिणगी बघता बघता संपूर्ण गेंिमग झोनला आगीच्या भक्ष्यस्थानी पाडताना दिसत आहे. ही घटना घडली तेव्हा काही वेळ कुणालाच काहीच कळले नाही. सगळे निश्चितपणे बाहेर पडताना दिसत होते. मात्र बघता बघता घटनास्थळी गोंधळ उडाला आणि जीव वाचविण्यासाठी पळापळ सुरू झाली. वेल्डिंग करत असताना निघालेली ठिणगी प्लॅस्टिकच्या ढिगावर पडली आणि बघता बघता भीषण आग लागली. त्यानंरत तिथे असलेल्या लोकांनी आग शमविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यात त्यांना अपयश आले. या अग्निकांडामध्ये ३५ जणांचा बळी गेला. त्यात ९ मुलांचाही समावेश होता. आता या अग्नितांडवाच्या घटनेबाबत गुजरात हायकोर्टाने सक्त भूमिका घेत स्वत: दखल घेतली आहे. तसेच मृतदेहांची डीएनए चाचणी लवकरात लवकर करण्याचे आदेश दिले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR