मैदानाबाहेरून
इंग्लंडविरुद्धच्या पहिल्या कसोटी सामन्यात भारतीय संघ २८ धावांनी पराभूत झाला. सामन्याच्या चौथ्या दिवशी इंग्लंडने बाजी मारली. शेवटच्या डावात भारतीय फलंदाजी कमजोर दिसून आली, तर इंग्लंडसाठी टॉम हार्टली याने अप्रतिम प्रदर्शन केले. फिरकीपटू गोलंदाजाने पदार्पणाच्या या सामन्यात एकूण ९ विकेट्स घेतल्या. यातील सात विकेट्स घेत मालिकेत एक झिरो आघाडी घेतली.
कसोटी क्रिकेटमध्ये माय देशात आपला संघ नेहमीच वरचढ ठरतो दक्षिण आफ्रिका इंग्लंड आणि ऑस्ट्रेलिया या जलद गतीस मदत करणा-या मैदानावर भारतीय संघाचा सुपडा साफ होतो पण भारतात फिरकीस मदत करणा-या खेळपट्टीवर ही भारतीय फलंदाज २८ धावांनी कमी पडली याचा अर्थ फिरकीचं शस्त्र बुमरंँग प्रमाणे भारतावरच उलटले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी केली याचे कारण की यजमानांच्या कसलेल्या फिरकी समोर चौथा डाव खेळायला अवघड जाईल पण झाले उलटे. टीम इंडियाचे फलंदाज नवोदित कसोटी पदार्पण करणा-या हार्टलीसमोर ढेपाळले जडेजा अश्विन आणि अक्षर पटेलच्या फिरकी समोर पाहुण्यांनी पहिल्या डावात २४६डावात गाशा गुंडाळला.
यजमानांनी १९० ची आघाडी घेतली ती आघाडी ओली पोपच्या संयमी आणि जबाबदार खेळीमुळे. भारताला २३१ धावांचे आव्हान दिले पण हे आव्हानही टीम इंडिया पेलू शकली नाही. शेवटच चार चेंडू खेळले असते तर पाचव्या दिवशी खेळावे लागले असते. पण अश्विन. सिराज यांना इतकी गडबड होती की प्रत्येक चेंडूवर यष्टीचितचे अपील केलं जात होतं खरे तर भारतीय संघाच्या पहिल्या चार फलंदाजांनीच या धावा करण्याची गरज होती. भारतीय फिरकी पटूनी इंग्लंडच्या दोन्ही डावात मिळून १४ विकेट घेतल्या होत्या दुस-या डावात बुमराचा रिव्हर्सस्विंग चालला होता एकंदरीत फिरकीच बूमरँग यजमानांवरच उलटलं.
कर्णधार बेन स्टोक्सने हार्टलीचे कौतुक केले. इंग्लंड संघाचा दुसरा डाव चौथ्या दिवशी दुस-या सत्रात संपला. १०२.१ षटकात इंग्लंडने ४२० धावा करून भारताला विजयासाठी २३१ धावांचे लक्ष्य ठेवले. सुरुवातील सोपे वाटणारे हे लक्ष्य भारताला प्रारंभीच्या विकेट्स गमावल्यानंतर कठीण वाटू लागले.
– डॉ.राजेंद्र भस्मे, कोल्हापूर