लातूर : प्रतिनिधी
येथील जुन्या एमआयडीसीतील साकोळकर फर्निचर या फर्निचर उत्पादक कंपनीला दि. २३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजण्याच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने भीषण आग लागली. या आगीत साकोळकर फर्निचर कंपनीतील ब्रॅण्डेड महागडे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाले आहेत. आग एवढी भीषण होती की, काही क्षणात या कंपनीच्या ग्राऊंड फलोअर आणि पहिल्या मजल्यापर्यंत आग पसरुन मोठे नुकसान झाले. अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली.
जुन्या एमआयडीसीत साकोळकर फर्निचरचे मोठे दालन आहे. या दालनात फर्निचर उत्पादनाचा मोठा उद्योग चालतो. त्याशिवाय ब्रॅण्डेड कंपन्यांचे फर्निचर, मॅटरेस, पंखे, कुलर्स, एसी व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीस उपलब्ध होते. आकर्षक असे वेगवगेळ्या स्वरुपाचे फर्निचर, कपाट, कुलर आदी साहित्य होते. शनिवारी दुपारी १२. ३० वाजण्याच्या सुमारास या फर्निचर कंपनीला शॉर्ट सर्कीटने आग लागली. काही क्षणातच संपुर्ण कंपनी आगीच्या लोळात सापडली. या आगीत कंपनीतील मॅटरेस, कच्चामाल, सागवान लाकडाचे महागडे बेड, कपाट, लाकडी मखर आदी जळून खाक झाले. आग लागताच १० मिनीटात जवळच असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली. तीन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.
खुप कष्टाने, मेहनतीने उभारलेले साकोळकर फर्निचर कंपनीला शॉर्ट सर्कीटने आग लागली. कंपनीतील प्लास्टिकचे साहित्य, इलेक्ट्रॉनिक वस्तू, मॅटरेस, कुलर जळाल्याने संपूणर््ा कंपनीत धुरच धुर झाला होता. आग इतकी भीषण होती की, कंपनीच्या छताचे लोखंडी
अँगल आगीने वितळून कोसळले होते. कंपनीत मोठ्या प्रमाणात महागडे फर्निचर होते. आग लागताच कंपनीतील कर्मचा-यांनी शक्य झाले तितके फर्निचर व इतर साहित्य कंपनीच्या बाहेर काढण्याचा प्रयत्न केला. परंतू, सर्वच फर्निचर व साहित्यांचा आगीच्या झळा लागल्याने बाहेर काढलेल्या फर्निचरचेही मोठे नूकसान झाले.
तीन ते चार कोटींचे नूकसान
साकोळकर फर्निचर ही कंपनी २००८ मध्ये स्थापन झाली. अल्पावधीत फर्निचरच्या क्षेत्रात या कंपनीने बॅ्रण्ड निर्माण केला. भाड्याच्या जागेत असलेली ही कंपनी जुन्या एमआयडीसीत स्वत:च्या जागेत एका वर्षापुर्वीच स्थलांतरीत झाली होती. खुप कष्टाने कंपनी उभी केली. परंतू, शनिवारी शॉर्ट सर्कीटने आग लागुन कंपनीचे तीन ते चार कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे, असे सांगताना कंपनीचे मालक आरिफ नजीर शेख (साकोळकर) यांचे आश्रु अनावर झाले.