36.5 C
Latur
Wednesday, April 30, 2025
Homeलातूरसाकोळकर फर्निचरला भीषण आग

साकोळकर फर्निचरला भीषण आग

लातूर : प्रतिनिधी
येथील जुन्या एमआयडीसीतील साकोळकर फर्निचर या फर्निचर उत्पादक कंपनीला दि़ २३ डिसेंबर रोजी दुपारी १२.३० वाजताच्या सुमारास शॉर्ट सर्कीटने भीषण आग लागली. या आगीत साकोळकर फर्निचर कंपनीतील ब्रॅण्डेड महागडे फर्निचर, इलेक्ट्रॉनिक्स वस्तू जळून खाक झाले आहेत. आग एवढी भीषण होती की, काही क्षणात या कंपनीच्या ग्राऊंड फलोअर आणि पहिल्या मजल्यापर्यंत आग पसरुन मोठे नुकसान झाले़. अग्निशमन दलाने शर्तीचे प्रयत्न करुन आग आटोक्यात आणली़.

जुन्या एमआयडीसीत साकोळकर फर्निचरचे मोठे दालन आहे़ या दालनात फर्निचर उत्पादनाचा मोठा उद्योग चालतो़. त्याशिवाय ब्रॅण्डेड कंपन्यांचे फर्निचर, मॅटरेस, पंखे, कुलर्स, एसी व इतर इलेक्ट्रॉनिक साहित्य विक्रीस उपलब्ध होते़ आकर्षक असे वेगवगेळ्या स्वरुपाचे फर्निचर, कपाट, कुलर आदी साहित्य होते. शनिवारी दुपारी १२़ ३० वाजण्याच्या सुमारास या फर्निचर कंपनीला शॉर्ट सर्कीटने आग लागली़ काही क्षणातच संपुर्ण कंपनी आगीच्या लोळात सापडली़ आग लागताच १० मिनीटात जवळच असलेल्या अग्निशमन दलाच्या जवानांनी घटनास्थळी धाव घेतली़ तीन गाड्यांच्या मदतीने आग आटोक्यात आणण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR