23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रराज्यात लवकरच तिसरी आघाडी?

राज्यात लवकरच तिसरी आघाडी?

बच्चू कडू महायुतीतून बाहेर पडणार? पत्रकार परिषद घेऊन घोषणा करणार

अमरावती : राज्यामध्ये महाविकास आघाडीनंतर आणखी एक तिसरी आघाडी स्थापन होऊ शकते. बच्चू कडू, संभाजीराजे छत्रपती आणि रविकांत तुपकर हे एकत्रित येवून विधानसभेच्या निवडणुका लढवणार आहेत, अशी सूत्रांची माहिती आहे.

सर्वच राजकीय पक्षांकडून विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु आहे. सध्या राज्यामध्ये राष्ट्रवादीचे दोन गट, शिवसेनेचे दोन गट; अशी परिस्थिती असून यातील एक-एक गट भाजपसोबत सत्तेत आहे. तर दुसरे दोन गट काँग्रेससोबत विरोधी पक्षातमध्ये आहेत. महायुती आणि महाविकास आघाडीने ताकदीने विधानसभा लढविण्याचा निर्धार केल्याचे दिसून येत आहे. लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला मिळालेल्या यशामुळे महायुतीला धडकी भरलेली आहे तर मविआकडे जिंकून येण्याचा निश्चय दिसून येत आहे. त्यातच आता एक नवीन आघाडी राज्यात स्थापन होऊ शकते.

‘आप’ही सोबत येणार?
बच्चू कडू यांची प्रहार संघटना, संभाजी राजे यांचा स्वराज्य पक्ष, रविकांत तुपकर यांची संघटना व आम आदमी पार्टी एकत्र विधानसभा निवडणूक लढण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे लवकरच बच्चू कडू व संभाजी राजे एकत्र पत्रकार परिषद घेऊन विधानसभा निवडणुकीबाबत अधिकृत घोषणा करणार असल्याचे कळत आहे.

विधानसभा गाजणार
पुणे इथे आयोजित करण्यात आलेल्या स्वराज्य पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचे प्रमुख पाहुणे बच्चू कडू होते. पक्षाच्या कार्यकर्ता प्रशिक्षण शिबिराचा समारोप झाल्यानंतर संभाजीराजे छत्रपती आणि बच्चू कडू यांच्यात निवडणुकीच्या संबंधाने चर्चा झाली. राज्यभरातील घटक पक्षांना एकत्रित करण्यासंदर्भात प्राथमिक चर्चा झाल्याची सूत्रांची माहिती.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR