23.2 C
Latur
Thursday, July 18, 2024
Homeमहाराष्ट्रहजारो कार्यकर्त्यांसह मोरेंचा ठाकरे गटांत प्रवेश

हजारो कार्यकर्त्यांसह मोरेंचा ठाकरे गटांत प्रवेश

महिला आघाडीच्या कार्यकर्त्यांचाही समावेश

मुंबई : मनसेमधून वंचित आघाडीमध्ये गेलेले पुण्याचे नेते वसंत मोरे यांनी मंगळवार दि. ९ जुलै रोजी ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. उद्धव ठाकरे यांच्या हस्ते शिवबंधन बांधून ते पुन्हा एकदा स्वगृही परतले आहेत. यावेळी संजय राऊत यांचीही उपस्थिती होती.

वसंत मोरे यांनी हजारो कार्यकर्त्यांसह मातोश्रीवर जात ठाकरे गटामध्ये प्रवेश केला. यावेळी काही नगरसेवक, शाखाध्यक्ष, महिला आघाडीच्या कार्यकर्त्या उपस्थित होत्या. आपण स्वगृही परतत असल्याच्या भावना वसंत मोरेंनी व्यक्त केल्या. त्यांनी १२ मार्च रोजी मनसेला रामराम ठोकला होता. यावेळी बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनेच्या बाहेर पक्षात काय वागणूक मिळते, काय सन्मान मिळतो.. याचा अनुभव घेऊन तुम्ही परिपक्व होऊन आलात. त्यामुळे मी तुम्हाला एक शिक्षा सुनावतो. असे म्हणत उपस्थितांना उद्देशून शिक्षा द्यायची का? असे विचारले. त्यावर सर्वांनी ‘हो’ म्हणतात, उद्धव ठाकरे म्हणाले की, तुमच्या सगळ्यांनी ही शिक्षा देतो की तुम्ही पूर्वीपेक्षा कित्येक पटींनी शिवसेना वाढीसाठी काम केले पाहिजे. लोकसभा निवडणुकीतून महाराष्ट्राने देशाला दिशा दिली आहे. तसेच काम करुन दाखवा, मी पुण्यात मोठा मेळावा घेतो असे उद्धव ठाकरे म्हणाले.

स्वगृही परतल्याचा आनंद
दरम्यान, मनसेमध्ये अंतर्गत कलहामुळे वसंत मोरे यांनी पक्षाला रामराम ठोकला होता. हा निर्णय त्यांनी लोकसभा निवडणुकीच्या पूर्वी घेतला होता. त्यांना लोकसभेसाठी वंचित आघाडीने तिकीट दिले. परंतु त्यांचा पराभव झाला. पुढे त्यांनी वंचित आघाडीसोबत न राहण्याचा निर्णय घेतला आहे. मोरेंनी यापूर्वी त्यांनी शिवसेनेसोबत काम केलेले आहे. परंतु राज ठाकरेंच्या विचारांनी प्रेरित होऊत ते राज यांच्यासोबत गेले होते. आता पुन्हा ते स्वगृही परतले आहेत.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR