काठमांडू : भारताचे शेजारील देश तिबेटमध्ये भूकंपाच्या तीव्र झटक्याने किमान १०० लोकांचे प्राण गेले आहेत. एव्हरेस्ट शिखरापासून जवळ असलेल्या गावात ७.१ इतक्या तीव्रतेच्या या भूकंपाने एक हजार घरे भूईसपाट होऊन किमान एक हजार गावकरी दगावल्याचे वृत्त आहे.
या भूकंपाचे केंद्र हजारो फूट उंचीवर असलेल्या टिंगरी गावात आहे. ज्या एव्हरेस्ट पर्वताचे उत्तर द्वार म्हटले जाते. विशेष म्हणजे एव्हरेस्ट शिखर या गावापासून अवघ्या ८० किलोमीटरवर आहे. भूकंपाचे केंद्र दहा किमी जमिनीच्या आत खोलवर आहे. भारताचा शेजारी असलेला तिबेट देशात ७.१ तीव्रतेचा मोठा भूकंप आल्याने जगातील सर्वात उंच असलेली भूमी अक्षरश : थडथडली असून भूकंपानंतरच्या छोट्या-छोट्या धक्क्यांनी संपूर्ण गावातील इमारती आणि घरे धाराशाही झाली आहे. एव्हरेस्ट पर्वातापासून ८० किमीवर असलेल्या टिंगरी गावात या भूकंपाचे केंद्र जमीनीच्या खाली १० किलोमीटरवर आहे. या गावातील सर्व एक हजार घरे जमीनदोस्त झाली आहेत. भूकंपाचे केंद्र कमी खोलीवर असल्याने मोठी हानी झाली आहे. यामुळे तीन तासांत येथे ५० वेळा धरणीकंप होऊन मोठे नुकसान झाले आहे.
तिबेट हा जगातील सर्वात उंच प्रदेश असून समुद्र पातळीपासून याची उंची १३०००-१६००० फूट आहे. पर्वतमय भाग असल्याने येथे भूकंपामुळे मोठी हानी होण्याची शक्यता असते. मंगळवारी सकाळी ९.१५ वाजता झालेल्या या ७.१ रिश्टर स्केल तीव्रतेच्या भूकंपाने येथे रस्त्याला भेगा पडल्या तर इमारती आणि घरे भूईसपाट झाली. यानंतर तीव्र झटक्याने ३ तासांत ५० ऑफ्टरशॉक झाले, त्यातील अनेक धक्क्यांची तीव्रता ४.४ रिश्टर स्केल नोंदवली गेली आहे. यामुळे टिंगरी आणि परिसरातील शेकडो घरे उद्ध्वस्त झाली आहेत.