23.2 C
Latur
Monday, December 23, 2024
Homeपरभणीस्कूल बसच्या धडकेत तीन वर्षीय बालिका जागीच ठार

स्कूल बसच्या धडकेत तीन वर्षीय बालिका जागीच ठार

मानवत : जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेच्या स्कूल बसने दिलेल्या धडकेत खरबा येथील ३ वर्षीय बालिका जागीच ठार झाल्याची घटना सोमवार, दि.२३ डिसेंबर रोजी सकाळी ८.४५च्या सुमारास घडली. ही घटना गावातील जुन्या पाण्याच्या टाकीजवळ करंजी रोडवर घडली. या प्रकरणी चालका विरूध्द गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी, खरबा येथील आसाराम निर्मळ हे आपल्या ३ वर्षाच्या शिवाज्ञा उर्फ राधा दत्ता निर्मळ नावाच्या नातीस हाताला धरून शेतात निघाले होते. याच वेळी खरबा येथील जुन्या पाण्याचे टाकीजवळील रोडवर रुढी पाटीकडुन करंजीकडे जाणा-या एमएच २२ – ३६४८ क्रमांकाच्या जिजाऊ ज्ञानतीर्थ शाळेच्या स्कुलबस चालकाने स्कुलबस जोरात चालवुन चिमुरडी राधा हिस जोराची धडक देवुन उडवले. यात राधा हिच्या डोक्याला गंभीर दुखापत होऊन तिचा जागीच मृत्यू झाला. याची माहिती गावक-यांना मिळताच घटनास्थळी जमा झाले. पोलीसांनी तात्काळ ग्रामीण रुग्णालयात दाखल केले मात्र तिथे तिला मृत घोषित केले. मयत मुलीचा चुलता मुंजा आसाराम निर्मळ यांच्या तक्रारीवर मानवत पोलीस ठाण्यात स्कूल बसचा चालक रामेश्वर उर्फ राजेभाऊ नामदेवराव पितळे याच्या विरुद्ध भरधाव व निष्काळजीपणे वाहन चालवून बालकाच्या मृत्यूस कारणीभूत झाल्या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तपास पोउपनि घोरपडे हे करीत आहेत.

 

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR