19.9 C
Latur
Saturday, November 23, 2024
Homeमहाराष्ट्रपुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला

पुण्यात सोन्याने भरलेला ट्रक सापडला

निवडणुकीच्या तोंडावर १३८ कोटींचे घबाड

पुणे : प्रतिनिधी
राज्यात निवडणुकांचे बिगुल वाजल्यापासून सर्वत्र नाकाबंदी आणि तपासण्या सुरू झाल्या आहेत. निवडणुकीमध्ये पैसे आणि गैरव्यवहार होऊ नये यासाठी मोठे प्रयत्न प्रशासनाकडून सुरू आहेत. अशातच आज पुण्यात सहकार नगर पोलीस स्टेशनच्या हद्दीत पुणे पोलिसांच्या नाकाबंदीत १३८ कोटींचे सोने पकडले गेले आहे. आज सकाळी ही कारवाई करण्यात आली आहे.

सातारा रस्त्यावर आज सकाळच्या सुमारास नाकाबंदी पोलिसांनी कोट्यवधीचे सोने जप्त केले आहे. एका संशयित वाहनाची पोलिसांनी झडती घेतली असता त्यात हे सर्व सोन्याचे दागिने सापडले. हे सोने नेमके आले कुठून, कुठे जात होते ? कोणाचे होते याचा तपास आता पोलिस करत आहे.

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पुणे शहरात जागोजागी पोलिसांनी नाकाबंदी केली आहे. संशयित वाहनांची तपासणी केली जात आहे. त्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी हे १३८ कोटी रुपये किंमत असलेले सोन्याचे दागिने जप्त केले आहेत. प्राथमिक माहितीनुसार, डिलिव्हरी ट्रान्सपोर्टची असण्याची शक्यता आहे.
खेड-शिवापूर परिसरात ५ कोटींची रोख रक्कम जप्त
पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली होती. या घटनेमुळे सध्या राजकीय वातावरण ढवळून निघालं होतं. सोमवारी रात्री पुण्यात खेड-शिवापूर परिसरात एका गाडीतून ५ कोटींची रोख रक्कम जप्त करण्यात आली.

Related Articles

आणखीन बातम्या

मनोरंजन

MOST POPULAR